पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या पाककृती स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संगीता गांधी, शिला होनराव, अलका ओझरकर विजेत्या
पुणे –
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत सुमारे ३०० महिलांनी सहभाग घेतला. संगीता गांधी, शिला होनराव, अलका ओझरकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
सहकारनगर, शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री. लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रागंणात महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी या स्पर्धेचे आयोजन केले. बटाट्यापासून तिखट पदार्थ आणि नारळापासून गोड पदार्थ हा पाककृती स्पर्धेसाठी विषय ठेवण्यात आला. त्यात तीनशे महिलांनी सहभाग घेतला. यात संगीता गांधी यांनी प्रथम तर शिला होनराव यांनी द्वितीय आणि अलका ओझरकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तर उत्तेजनार्थ पारितोषिके वर्षा तेलंग , अनिता काळे यांना मिळाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून दीपाली दुबे यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेतील विजेत्या महिलांना महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, शोभा इंदाणी , अंजली पुराणिक यांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेचे संयोजन हर्षदा बागुल , दीपा बागुल , सोनम बागुल, नूपुर बागुल यांनी केले.