पुणे
१९व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सहकारनगर , शिवदर्शन येथील प्रसिद्ध लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात इयत्ता ४ थी ते ६ वी. व इयत्ता ७ वी ते ९ वी या लहान व मोठा गटासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी केले.यावेळी ३०० मुला -मुलींनी सहभाग घेतला. त्यात छोट्या गटामध्ये आदित्य विश्वे याने प्रथम तर आवनी जाजू हिने द्वितीय ,रिया भंडारी हिने तृतीय क्रमांक आणि श्रेयस मुनोत , चैतन्य लोढी या दोघांच्या उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावली. तर मोठ्या गटात दिव्या गुरव हिने प्रथम क्रमांक ,मोक्ष शहा द्वितीय तर निधी मुथा हिने तृतीय क्रमांक पटकावला. प्रियाल कोटक व ओम सातकर या दोघांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. परीक्षक म्हणून राजेश्वरी
करले
यांनी कामकाज पाहिले. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल
, उपाध्यक्षा निर्मला जगताप, हर्षदा बागुल , नुपूर बागुल, नम्रता जगताप, संगीता बागुल ,
गजानन माने , श्रीकांत बागुल यांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.