पुणे
आई नाही की वडीलही नाहीत,इतकंच काय कुणी नातेवाईकही नाहीत. जन्मदात्यांमुळे पदरी पडलेला दुर्धर आजार आणि अनाथ म्हणून आश्रमात मिळालेला आधार ;मग मनातील इच्छा कोण पूर्ण करणार ? हा साधा सरळ प्रश्न असताना राजधानी दिल्ली आणि आग्रा येथील ताजमहाल पाहण्याची इच्छा, तेही विमान प्रवासाद्वारे पूर्ण झाल्याने ‘ते’ आनंदीत झाले आणि आपल्यासाठी कोणीतरी हक्काचा माणूसही आहे यामुळेही गहिवरले !
यावेळी अमित बागुल म्हणाले माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या समाजकारणामुळे समाजात विविध घटकातील नागरिकांना साठी काम करण्याची प्रेरणा मिळाली असून मी व माझे सहकारी वर्षभर विविध उपक्रमांचे आयॊजन या मुलांसाठी करत असतो गेल्यावर्षी या मुलांनी माझ्याकडे विमान प्रवासाची इच्छा व्यक्त केली होती ते किती दिवस जगणार हे त्यांना हि माहित नाही परंतु त्यांच्या इच्छापूर्ण केल्याने त्यांना जगण्याची उमेद मिळेल या हेतूने या विमान सहलीचे आयोजन आम्ही करीत आहोत यंदाचे हे दुसरे वर्ष असून त्यांच्या जीवनात जगण्याची उमेद जगवण्यासाठी समाजातील घटकांनी पुढे येऊन त्यांचा आनंद द्विगुणित करावा . स्वप्नं तर सर्वच जण पाहतात;मात्र समाजामधील उपेक्षित, वंचित घटकांचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जिद्द ,तळमळ आणि प्रत्यक्ष योगदानाचे उदाहरण काँग्रेसचे अमित बागुल यांनी समाजासमोर ठेवले आहे. आपला वाढदिवस ज्यांना कुणी नाही आणि ते किती काळ जगतील याची शाश्वती नाही अशा ममता फाऊंडेशन ,कायाकल्पमधील अनाथ मुलांमुलींसमवेत साजरा केला. विशेष म्हणजे ‘त्या ‘ मुलामुलींनी राजधानी दिल्ली ,राष्ट्रपती भवन आणि प्रेमाचे प्रतीक आणि जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेल्या आग्रा येथील ताजमहाल पाहण्याची इच्छा त्यांनी अमित बागुल यांच्याकडे व्यक्त केली. आणि अमित बागुल यांनी समाजकारणाचा वारसा असलेल्या आपल्या वडिलांच्या म्हणजेच माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ते दिल्ली -आग्रा -पुणे विमानप्रवासाची विशेष सफर घडविल्याने ती मुले आनंदित झाली. राष्ट्रपतीभवन , दिल्ली दर्शन आणि आग्रा येथील ताजमहाल पाहताना या मुलांना आपल्याला दुर्धर आजार आहे शिवाय आपण अनाथ आहोत याचाही विसर पडला
. अमित दादा तुम्ही आमच्यासाठी इतकं केलं हे सांगताना पाणावलेल्या डोळ्यांमुळे
उपस्थितांच्याही डोळ्यातूनही अश्रू तरळले आणि दिल्ली -आग्रा सहलीच्या निमित्ताने गतवर्षी पुणे -बंगलोर -पुणे या पहिल्या हवाई सफरीच्या आठवणी सर्वांनी जागविल्या. दिल्लीतून पुण्याकडे परताना जगण्याची नवी उमेद जागी झाली. यावेळी नंदकुमार बानगुडे,सागर आरोळे , अभिषेक बागुल, कल्पेश पाटील , महेश ढवळे , संतोष गेले , कुणाल खोपडे,सुधीर शिंदे,दीपक गावडे,राहुल तौर , लक्समन जननु , विजय बिबवे, सुयोग्य धाडवे, आशिष कांबळे , विक्रांत गायकवाड, ऋषिकेश मोडवे आदी सहभागी झाले होते.

