पहिली पणती शहीदांसाठी या विशेष उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (व्हिडिओ)
पुणे-सीमेवर जवानांचा खडा पहारा आहे म्हणून भारतीय सुखात जगत आहेत. प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांचे स्मरण करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज तळजाई माता मंदिर येथे एक पणती शहीदांसाठी… या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांनी उस्फुर्द प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपमहापौर आबा बागुल तसेच जयश्री बागुल, नंदकुमार बानगुडे ,रमेश भंडारी,घनशाम सावंत यांनी केले होते .
आपण मोठ्या दिमाखात दिवाळी साजरी करतो पण आपले जवान आपल्या घरच्यांची पर्वा न करता सर्व नागरिकांची दिवाळी साजरी होण्या साठी सीमेवर पहारा देतात त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत त्यांना विसरता काम नये. यावेळी देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना सलामी देवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली .