सहकारनगर -पदमावती प्रभागात
माजी उपमहापौर आबा बागुल यांचा उपक्रम
पुणे
”तुम्ही आहात म्हणूनच आम्ही आहोत,तुमचं अस्तित्व आणि तुमचं कर्तृत्व समाजासाठी खरंच ग्रेट आहे”,अशा आशयाचे सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ पाहून सहकारनगर -पदमावती प्रभागातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दीडशे महिला भारावल्या आणि महिलादिनी आमच्या घरी , कार्यालयात येऊन आम्हाला या दिलेल्या सुखद शुभेच्छांचा ‘ग्रेट -भेट ‘ अंतर्गत उपक्रम सदैव प्रेरणादायी आहे अशा शब्दात या महिलांनी प्रतिक्रियाही नोंदविल्या.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक आबा बागुल यांच्या संकल्पनेतून सहकारनगर -पदमावती प्रभागातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दीडशे महिलांचा त्यांच्या घरी , कार्यालयात जाऊन या उपक्रमाचे संयोजक अमित बागुल यांनी गौरव करून स्त्री कर्तृत्वाचा जागर केला. सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ आलेल्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर भारावलेल्या महिलांनी या उपक्रमाचे स्वागत केले. याबाबत संयोजक अमित बागुल म्हणाले, अथांग सागरात तग धरून किनारा गाठणारे
जहाज आणि त्याचा कप्तान एकप्रकारे संयम , जिद्दीचे प्रतीक आहे. आज अनेक अडचणींना सामोरे जात यशाची शिखरे पादाक्रांत करणारी स्त्री जीवनाच्या प्रत्येक वळणावर कुटुंबाबरोबरच समाजालाही दिशादर्शक ठरली आहे. तिच्या कर्तृत्वाला आणि अस्तित्वाला सलाम करण्यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात असेही त्यांनी स्पष्ट केले.

