पुणे-पुणे नवरात्र महिला महोत्सवात शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात आज लहान मुला
मुलींच्या प्रतिभेचे दर्शन चित्रकला स्पर्धेतून झाले. सुमारे ५०० हून अधिक विविध वयोगटातील या मुला
मुलींनी २ तासात सुंदर चित्रे रेखाटत त्यात रंग भरले आणि या स्पर्धेतही रंगत आणली. या स्पर्धेसाठी इयत्ता १
ली ते ३ री तील विद्यार्थ्यांसाठी दिलेले छापील चित्र रंगवणे, इयत्ता ४ थी ते ६ वीतील विद्यार्थ्यांसाठी पतंग
उडविणारी मुले, पावसातील मजा आणि इयत्ता सातवी ते नववी साठी आवडता सण, खेळणी विक्रेता, शेतात
काम करणारे शेतकरी असे विषय देण्यात आले होते. मुलामुलींच्या किलबिलाटात चित्रे रंगून झाल्यावर पुणे
मनपाचे चित्रकला शिक्षक प्रकाश उघडे, नंदू मोरे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. या तीन गटातील
विद्यार्थ्यांना प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ ६ अशी बक्षिसे देण्यात आली.
इयत्ता पहिली ते तिसरी या गटात कु. हित बागरेचा, इयत्ता ४ थी ते ६ वी गटात कु .इशा वाघ व
इयत्ता ७ वी ते ९ वी गटात कु. गौरी चंदनशिवे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. इयत्ता पहिली ते तिसरी
वयोगटात पहिल्या ३ क्रमांकांना अनुक्रमे सायकल, स्टडी टेबल, घड्याळ आणि स्कूलबँग देण्यात आल्या. इयत्ता
४ ते ६ वी व ७ वी ते ९ वी या वयोगटात प्रथम ३ क्रमांकांना अनुक्रमे ५०००, ३०००, २००० रुपये देण्यात
आले. जेष्ठ वास्तू विशारद महेश नांगपुरकर व सौ. उमा नांगपुरकर तसेच पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या
अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या नंतर सर्व स्पर्धक लहान मुला-मुलींना अल्पोपहार
ज्यूस कंटेनर आणि खाऊ देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता बागुल, प्राजक्ता ढवळे,
वृषाली बागुल यांनी विशेष काम केले. या कार्यक्रमाचे प्रायोजक शारदा कनस्ट्रकशनचे गजानन माने, हेमंत
बागुल होते.
![रंगांची उधळण आणि किलबिलाटात महिला महोत्सवात चित्रकला स्पर्धा संपन्न](https://mymarathi.net/wp-content/uploads/2018/10/पुणे-नवरात्र-महिला-महोत्सव-चित्रकला-स्पर्धा-फोटो.jpg)