पुणे- भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जीवनावरील ‘आयर्न लेडी ‘ नावच्या फोटोंचे प्रदर्शन आजपासून पुण्यातील सारस बागेसमोरील ठाकरे कलादालन येथे भरले आहे . प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांनी भरविलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन आज सकाळी कॉंग्रेस चे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी केले . यावेळी कॉंग्रेस चे नेते उल्हास पवार संजय बालगुडे , सुधीर कुरुमकर , बंडू नलावडे , राजेंद्र भुतडा आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते .येत्या ३ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते सहा या वेळेत हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले असणार आहे .