कोकणात साकारणार औषध निर्माण उद्यान

Date:

मुंबई, दि. 23 : मुरूड व रोहा तालुक्यामध्ये 17 गावामधील एकूण 1994.969 हे.आर. क्षेत्र औषध निर्माण उद्यान (bulk Drug Park) ची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत अधिसूचित करण्यात आले असून या ठिकाणी bulk Drug Park विकसीत करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती उद्योग विभागाने दिली आहे.

रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन निर्णय क्र.टीपीएस 1219/150/प्र.क्र.7819/नावि.12, दि.19.1.2019 अन्वये रायगड जिल्ह्यामधील 40 गावांमधील अंदाजे 13408.473 हे.आर. जमीन एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी सिडकोने अधिसूचित केले होते.

केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाच्या 2 जून 2020 च्या अधिसूचनेनुसार औषध निर्माण विभागाने औषध निर्माण उद्याने विकसीत करण्याकरिता प्रोत्साहन देण्यासंदर्भातील योजनेनुसार रोहा व मुरूड तालुक्यातील 17 गावामधील एकूण 1994.969 हे.आर. क्षेत्रावर औषध निर्माण उद्याने (bulk Drug Park) ची स्थापना करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळामार्फत सिडको यांना हे क्षेत्र विनाअधिसूचित करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यानुसार सिडकोने हे क्षेत्र विनाअधिसूचित केले आहे.

महाराष्ट्र राज्यात मेगा रिफायनरी तथा पेट्रोकेमिकल प्रकल्पाकरिता राजापूर तालुक्यातील 14 गावातील एकूण 5461.465 हे.आर क्षेत्र तसेच Crude Oil Terminal (COT) and Desalination Plant साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये व रामेश्वर येथील एकूण 405.559 हे.आर. क्षेत्र दि. 18.5.2017 रोजी अधिसूचित करण्यात आले होते.

परंतु रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनास अधिसूचित केलेल्या जागेच्या भूसंपादनास भूधारकांच्या व तेथील संघटनेचा प्रचंड विरोध असल्याने तेथे मोजणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर हे संपूर्ण क्षेत्र दि.02.03.2019 रोजीच्या अधिसूचनेद्वारे विनाअधिसूचित करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेश बिडकरांच्या महा ई-सेवा केंद्रातून तब्बल २७ हजार लोकांनी घेतला लाभ

पुणे : शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही स्वतंत्र लढू, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे विधान

मुंबई-"पुण्यात जर दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार...

ठाकरे बंधू एकत्र येताच भाजपने रणनीती बदलली:शिंदे गटासाठी जागांची संख्या वाढवली, तरीही नाराजी

मुंबई-आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज ठाकरे आणि...