- आळंदी येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या नामफलकाचे उद्धाटन
पिंपरी : प्रतिनिधी
देशातील सर्व टॅक्सी रिक्षा व वाहतूकदार एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न व समस्या सुटणार नाहीत. देशव्यापी शिखर संघटन निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामधून या घटकांचे प्रश्न मार्गी लागतील. यासाठी देशभरात सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष कष्टकरी नेते बाबा कांबळे यांनी केले.
आळंदी देवाची येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या फलकाचे उद्धाटन बाबा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात दिल्ली येथे रिक्षा, टॅक्सी, चालक मालकांची राष्ट्रव्यापी परिषद 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परिषदेला देशभरातून विविध संघटना, रिक्षा, टॅक्सी चालक मालक उपस्थित राहणार असल्याचेही बाबा कांबळे यांनी सांगितले.सकाळी 11 वाजता, महात्मा गांधी स्मृती सभागृह,दर्शन स्मृती ट्रस्ट राजघाट समोर नवी दिल्ली येथे ही परिषद होईल.
या परिषदेला महाराष्ट्रातील नरेंद्र गायकवाड, नांदेड मराठवाडा गफार भाई नदाफ, सातारा कराड पश्चिम महाराष्ट्र आनंद चावरे, नागपूर, विदर्भ शिवाजी गोरे, ठाणे कल्याण डोंबिवली, मुंबई ग्रामीण व कोकण विभाग कासम मुलांनी, नवी मुंबई, कोकण रिझल्ट जावेद देऊळकर मुंबईप्रदेश, यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने रिक्षा चालक-मालकांचे सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
देशभरात रिक्षा, टॅक्सी चालकांची संख्या तीन कोटी पेक्षा अधिक आहे. 24 कोटी पेक्षा अधिक वाहतूकदार ड्रायव्हर आहेत. माठी संख्या असलेल्या या घटकांसाठी केंद्र स्तरावर पुरेशा सुविधा, सामाजिक सुरक्षा, निवृत्तीवेतन, आरोग्य विमा आदी सुविधा दिल्या जात नाही. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे कायदे आहेत. केंद्रीय कायद्याच्या आधारित राज्यातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कायदा केला जातो. परंतु केंद्रीय वाहतूक कायद्याची सर्वत्र राज्यांमध्ये अंमलबजावणी केली जाते.
देशांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या रिक्षा, टॅक्सी व वाहतूक धारकांसाठी देशपातळीवरती सर्व संघटनांनी एकत्र येऊन शिखर संघटना स्थापन करण्याच्या हेतूने ही परिषद आयोजित केली आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पंजाबसह देशभरातील रिक्षा टॅक्सी व वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो म्हणून बाबा कांबळे यांचा फोटो व्हायरल झाला होता. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रीय निमंत्रक राजेंद्र सोनी दिल्ली यांनी दिली देशभरामध्ये वेगवेगळ्या ऑटो रिक्षा संघटना आहेत. वाहतूकदारांच्या संघटना आहेत. परंतु या संघटना आतापर्यंत देशपातळीवर कधी एकत्र आल्या नाहीत. नुकताच बाबा कांबळे यांचा फोटो मुख्यमंत्र्यांचा फोटो म्हणून व्हायरल झाला. तो फोटो महाराष्ट्राच्या देशभरामध्ये सर्वत्र कौतुकाचा व चर्चेचा विषय ठरला. या फोटोमध्ये रिक्षासमोर उभे असलेले बाबा कांबळे हे खरच रिक्षा चालक होते. ते रात्रभर काम करत आहेत. त्यांचा वायरल झालेला फोटो देशभरात सर्वत्र प्रसारित झाल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये सर्व संघटना एक होतील, अशी आशा निर्माण झाली आहे. यामुळेच आम्ही ही परिषद आयोजित केली असल्यचे सोनी यांनी सांगितले.