नवी दिल्ली-
अरबी समुद्रात बुडणाऱ्या व्यापारी जहाजातील २२ जणांचा जीव वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. भारतीय तटरक्षक दलाने (ICG) समुद्रात बुडणाऱ्या एमटी ग्लोबल किंग आय या व्यापारी जहाजातून सर्व २२ क्रू मेंबर्सची सुटका केली आहे. ICG जहाजे आणि ALH ध्रुव पोरबंदर येथून रवाना करण्यात आले होते, ज्यांच्या मदतीने समुद्रात 93 नॉटिकल मैल अंतरावर बचाव कार्य करण्यात आले, अशी माहिती indian coast gaurd ने दिली आहे.सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 20 भारतीयांसह 1 पाकिस्तानी आणि 1 श्रीलंकेचा नागरिक आहे. सुटका करण्यात आलेल्या लोकांना ICG जहाजाने आणि हेलिकॉप्टरद्वारे पोरबंदर येथे आणले गेले.

