मुंबई: मुंबईतील मालाडमध्ये २१ मजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जनकल्याण नगरमध्ये या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत एका तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आहे११ वाजताच्या सुमारास कांदिवली पश्चिम येथील जनकल्याण नगर परिसरातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे. आगीचे मोठमोठे लोट खिडकीतून बाहेर येताना दिसत आहेत. यावेळी जीव वाचवण्यासाठी एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेतली..
आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या पथकाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.शिवडी परिसरातल्या जनकल्याण नगर येथील मरिना एन्क्लेव्ह या 22 मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडलीय. सकाळी अकरा वाजून चार मिनिटांनी ही आग लागली. सकाळी सव्वाअकरापर्यंत ही आग विझवण्यात आली. या घटनेत आठ जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.