विषमुक्त शेतमाल निर्मितीसाठी अभिनव फार्मर्स क्लब व बीव्हीजीचा संयुक्त प्रकल्प

Date:

प्रकल्पाचे सोमवारी ४ वा. ऑनलाईन उदघाटन 
पुणे (प्रतिनिधी) -विविध प्रकारच्या विषाणू संक्रमणाच्या काळात विषमुक्त शेतमालाची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीचा पुरवठा मात्र होत नाही. भारतीयांना विषमुक्त शेतमालाचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने अभिनव फार्मर्स क्लब व भारत विकास ग्रुप (बीव्हीजी)  एकत्र प्रकल्प राबवणार आहे. सदर प्रकल्पाचे सोमवारी ४ वा. ऑनलाईन उदघाटन होणार आहे.  अभिनवचे भूषण राऊत व बीव्हीजी ॲग्रोटेकचे प्रमुख गणेश लिमये यांनी या प्रकल्पाची नुकतीच घोषणा केली. सदर प्रकल्प राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. 
बीव्हीजी औषधांमुळे शेतमालाच्या सरासरी उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ होते. विशेषबाब म्हणजे विषमुक्त शेतमालाची (रेसिड्यू फ्री) निर्मिती होते. विषमुक्त शेतमालाची चांगल्या दराने थेटविक्री करणे सहज शक्य आहे. अभिनव फार्मर क्लब ही सेंद्रीय शेतमालाची घरपोहोच सेवा देणारी शेतकऱ्यांनी सुरु केलेली देशातली  पहिली कंपनी आहे. अभिनव फार्मर्स क्लब व बीव्हीजीमुळे शेतकऱ्यांना अधिकचा नफा व नवी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची प्रतिक्रिया अभिनव फार्मर क्लबचे प्रमुख ज्ञानेश्वर बोडके यांनी व्यक्त केली. 
रासायनिक औषधांचा वारेमाप वापर झाल्याने जमिनीची सुपीकता कमी झाली आहे. त्याचबरोबर  पिकांची उत्पादन क्षमता देखील कमी झाली आहे. जमिनीची सुपीकता वाढवून विषमुक्त शेतमालाचे भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी बीव्हीजीच्या वतीने हर्बल नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून विविध खत व औषधांचे निर्माण केले जाते. बीव्हीजी औषधांच्या वापराने विषमुक्त शेतमालाचे दुप्पट उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...