पुणे, ता ७ : अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर फटका बसला. यामुळे या भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. अशा परिस्थितीमध्ये कर्त्यव्य भावनेतून येथील बांधवांना मदत करण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पक्षा मार्फत खारीचा वाटा म्हणून आज मदत साहित्य रवाना करण्यात आले. राज्याचे विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून ३ ट्रक आणि ३ टेम्पो मदत रवाना करण्यात आली.
निसर्गाच्या लहरीपणामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. यामुळे अनेक नद्यांना महापूर आला. महापूर आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे कोकणात स्थिती अत्यंत भीषण आहे. आशा काळात सामाजिक बांधिलकी म्हणून कोकणात पुणे शहर भारतीय जनता पक्षामार्फत ही मदत पाठवण्यात आली. यापूर्वीही चिपळूण मधील खेर्डी तसेच आजूबाजूंच्या गावांना पाच टेंपो मदत पाठवण्यात आली होती.
या मदत साहित्यामध्ये गृहोपयोगी साहित्य, ब्लॅंकेट, धान्य, बिस्कीट पुडे, सॅनिटरी पॅड, पाण्याच्या बॉटल, टॉवेल, चप्पल, खाद्य तेल, चटई,साड्या, लहान मुलांची तसेच महिला आणि पुरुषांची कपडे, कोरडा खाऊ , सतरंजी, हँड वॉश, मोबाईल फोन, टुथपेस्ट, टुथब्रश, मास्क, कपड्याचे साबण, स्वेटर, बेडशीट, सॅनिटायजर या सारखे साहित्य आहे.
यावेळी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ,सभागृहनेते गणेश बिडकर, ओबीसी आघाडी अध्यक्ष योगेश पिंगळे,आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे,, माजी आमदार योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी,शिक्षण मंडळ अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर,भाजप पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट, गणेश कळमकर, भाजप पुणे शहर सरचिटणीस दत्ता खाडे, राजेश पांडे, संदीप लोणकर, सुनील पांडे, दीपक पोटे, गणेश घोष, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, पुणे शहर भाजप चिटणीस तसेच पूरग्रस्त समन्वयक सुनील माने, मंडळ अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, प्रमोद कोंढरे, नगरसेवक आदित्य माळवे, सुलोचना कोंढरे, तेजेंद्र कोंढरे, पुणे शहर भाजप प्रवक्ता विकास लवटे, कार्यालय प्रमुख सुभाष मामा देशमुख,पुणे शहर भाजप अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष अन्वर पठाण, , कामगार आघाडी अध्यक्ष संतोष कांबळे, दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष मनोज पिल्ले, राणी कांबळे, राजू परदेशी, छगन बुलाखे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

