बर्न– स्वित्झर्लंडमधील अल्प पर्वतीय भागांत हिमनदीच्या वितळलेल्या पाण्यापासून बनलेली नैसर्गिक गुहा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. चारही बाजूंनी बर्फच बर्फ असलेल्या पर्वतीय क्षेत्रात ही गुहा आहे. ही गुहा पाहण्यासाठी लाेक या ठिकाणी भेट देत आहेत. ‘द मिल’ असे या गुहेचे नाव असून लाेकांनी स्वत: जाेखीम पत्करून गुहेचा दाैरा करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
२० मीटर लांब व ५ मीटर खाेल अशा स्वरूपाची ही गुहा आहे. दरवर्षी या गुहेचा आकार बदलताे, असे स्थानिक लाेक सांगतात. ही गुहा स्की रिसाॅर्टपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळेच येथे दरवर्षी लाखाे पर्यटक भेट देतात.
60 टक्के जमिनीवर हिमपर्वत
स्वित्झर्लंडमधील ६० टक्के जमिनीवर हिमपर्वत दिसून येतात. असा युराेपातील हा पहिलाच देश आहे. येथे माेठ्या प्रमाणात बर्फवृष्टी हाेते. सुंदर पर्वत, गावे, तलावांचा देश म्हणूनच दरवर्षी लाखाे लाेक येथे पर्यटनासाठी येतात.

