पुणे : ‘एशियन आय हॉस्पिटल’ च्या ‘एशियन आय फाउंडेशन’ या चॅरिटेबल शाखेच्या वतीने नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ९, १० आणि ११ ऑगस्ट २०१९ रोजी संस्थेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त हे शिबीर होणार आहे. या शिबिरात लॅसिक लेझर द्वारा चष्मा घालविण्यासाठी शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. यात तपासणी, गॉगल व औषधे मोफत देण्यात येतील, अशी माहिती नेत्रतज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया यांनी पत्रकाद्वारे दिली.
शिबिराचा हेतू सांगताना डॉ. कांकरिया म्हणाले, ‘चष्मा हा आज दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. चष्म्यामुळे लोकांना बऱ्याच संधींना मुकावे लागते. आज जर सैन्यात जायचे असेल, पोलिसांत भरती हवी असेल, तसेच मुलींना लग्नामध्ये अडचणी येतात. या सामाजिक दृष्टिकोनांचे भान ठेवून चष्मा घालविण्यासाठी लेझर शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.’
युवक-युवतींना केवळ चष्मा असल्याने विवाह व नोकरीच्या वेळी अडचण निर्माण होते. त्यांना महत्वाच्या संधी गमवाव्या लागतात, म्हणून दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात येते. साधारणपणे १८ ते ४० वयोगटातील लोकांवर चष्मा घालविण्यासाठी लॅसिक, फेम्टोलॅसिक, रिलेक्स स्माईल या प्रगत जर्मन तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.
ही लेझर पद्धती लॅसिक, ब्लेडविरहित लॅसिक व स्माईल लेझर (जर्मनी) या जगातील सर्वोत्कृष्ट उपकरणांवर होते. लेझरला १० मिनिटे लागतात. तसेच यासाठी कोणतेही भूल, इंजेक्शन, टाके पद्धतीची गरज नसते. लेझरनंतर ३ दिवसांमध्ये दैनंदिन कामाला सुरुवात करू शकतो.’
डॉ. कांकरियांनी १९८५ सालापासून चष्मा घालविण्याच्या शस्त्रक्रिया सुरू केल्या. व मागील ३४ वर्षांपासून असंख्य रुग्णांचे चष्म्याचे नंबर घालविले आहेत. लॅसिक लेझरचे जनक प्रोफेसर पॅलिकॅरिस (अमेरिका) यांच्याकडे शिकणारे डॉ. वर्धमान कांकरिया हे एकमेव भारतीय नेत्रतज्ञ आहेत.
‘एशियन आय हॉस्पिटल’ला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नेत्रालय पुरस्कारही नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते देण्यात आला. ‘एशियन आय फाउंडेशन’ ही एशियन आय हॉस्पिटलची चॅरिटेबल शाखा आहे.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी :-
‘एशियन आय हॉस्पिटल’, पुणे स्टेशनजवळ, जहागीर नर्सिंग होम समोर, पुणे.
फोन नं. : ०२०-२६१६२४२४ / ७०६६४२४६९९ सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधावा.