Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पश्चिम महाराष्ट्रात ८५०४ कोटींच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात

Date:

पुणे, दि. १३ ऑगस्ट २०२१: वारंवार आवाहन व विनंती करून देखील भरणा होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीतील ग्राहक व कृषिपंपाच्या वीजबिलांची थकीत रक्कम तब्बल ८ हजार ५०४ कोटी ८६ लाखांवर गेली आहे. वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक घडी विस्कटल्याने व अन्य कोणताही पर्याय नसल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला आहे.

सद्यस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील २४ लाख ८ हजार २०९ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे १०२३ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ७ लाख ३९ हजार ९०९ कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे ७ हजार ४८१ कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वाढतच असल्याने तसेच कृषिपंपांच्या चालू वीजबिलांचा देखील भरणा होत नसल्याने नाईलाजाने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महसुलासाठी अन्य कोणताही मुख्य स्त्रोत उपलब्ध नसल्याने प्रामुख्याने वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच महावितरणची आर्थिक मदार आहे. मात्र वीजबिलांच्या थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने सद्यस्थितीत वीजखरेदीदैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्चकर्जांचे हप्तेकंत्राटदारांची देणीआस्थापनांचा खर्च भागविण्यासाठी महावितरणची तारेवरची कसरत सुरु आहे. त्यामुळे नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याचा कटू कारवाई सुरु करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विजेची वाढती मागणी २० हजार ते २१ हजार ५०० मेगावॅटवर स्थिरावली आहे. परंतु आर्थिक संकटात असताना देखील महावितरणकडून विजेच्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात येत आहे, हे उल्लेखनीय.

सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये पुणे जिल्ह्यात ११ लाख ३ हजार ३१५ ग्राहकांकडे ५४२ कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर सातारा जिल्ह्यात २ लाख २७ हजार ४८४ ग्राहकांकडे ५२ कोटी १९ लाख, सोलापूर जिल्ह्यात ३ लाख ३७ हजार ५६३ ग्राहकांकडे १३२ कोटी ५२ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ४ लाख ३८ हजार ९८२ ग्राहकांकडे १८७ कोटी ७९ लाख आणि सांगली जिल्ह्यात ३ लाख ८६५ ग्राहकांकडे १०७ कोटी ९२ लाख रुपयांची थकबाकी आहे.

यासोबतच कृषिपंप वीज धोरणामधून पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील १२ लाख ४४ हजार ६८७ कृषिपंपधारक शेतकऱ्यांना थकबाकीमध्ये एकूण २६४३ कोटी रुपयांची महावितरणकडून निर्लेखनद्वारे तसेच विलंब आकार, व्याजातून सूट देण्यात आली आहे. या शेतकऱ्यांकडे आता सुधारित ८ हजार १७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के थकबाकी येत्या मार्च २०२२ पर्यंत चालू वीजबिलासह भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी देखील माफ होणार आहे. आतापर्यंत ५ लाख ४ हजार ७७८ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. चालू वीजबिलासह या शेतकऱ्यांनी ६८७ कोटी ८२ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. यामध्ये त्यांना भरलेल्या थकबाकीएवढी म्हणजे ३४६ कोटी ७३ लाख रुपयांची अतिरिक्त सूट मिळाली आहे.

या कृषी वीज धोरणाचा लाभ घेत पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ६७ हजार १२६ शेतकऱ्यांनी चालू वीजबिलाचे ८० कोटी ८० लाख आणि सुधारित थकबाकीचे २५० कोटी २९ लाख रुपयांचा भरणा करीत वीजबिलातून थकबाकीमुक्ती मिळविली आहे. या सर्व थकबाकीमुक्त झालेल्या शेतकऱ्यांचे त्यांनी भरलेल्या थकबाकीएवढेच म्हणजे २५० कोटी २९ लाख रुपयांची रक्कम देखील माफ झाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...