– भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
मुंबई दि. २३ एप्रिल- देशावर आलेले कोरोनाच्या दुस-या लाटेचे गंभीर सकंट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना मे आणि जून २०२१ या दोन महिन्यासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.या योजनेमुळे देशातील ८० कोटी जनतेला प्रति ५ किलो धान्य मोफत देण्यात येणार असून त्यासाठी २६,००० कोटीचा भार केंद्र सरकार उचलणार आहे. पंतप्रधानांच्या या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्राच्या कोट्वधी जनतेच्यावतीने भाजपा महाराष्ट्र त्यांचे अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेचे संकट अधिक धोकादायक आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता पंतप्रधान मोदी यांनी आज अंत्योदयाची चिंता व्यक्त केली. त्यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरु करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या योजनेमुळे देशातील ८० कोटी जनतेला प्रति ५ किलो धान्य मोफत देण्यात येणार असून त्यासाठी २६,००० कोटीचा भार केंद्र सरकार उचलणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातही कोरोनाची परिस्थिती अतिशय भयावह होत चालची आहे. हातावर पोट असणाऱ्या महाराष्ट्रातील कोट्यवाधी जनतेला केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेकडून पंतप्रधान मोदी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतानाच भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जमेल ती सर्व मदत करण्यास सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादनही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले.

