किफायतशीर घरांसाठी ७९,००० कोटी रु. निधीची तरतूद इमारत, बांधकाम साहित्य आणि संबंधित क्षेत्रांसाठी उतप्रेरक- प्रकाश छाबरिया

Date:

फिनॉलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष श्री. प्रकाश छाबरिया यांचे केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ बाबत वक्तव्य

अर्थसंकल्पाने उपभोगाला अधिक प्रोत्साहन देण्यावर आणि अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यावर भर दिला आहे त्याचे आम्ही कौतुक करतो. कृषी क्षेत्रावर वाढीव लक्ष केंद्रित केल्याने शेतकऱ्यांना त्यांचे कामकाज सुरळीतपणे करण्यास मदत होईल आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी अधिक निधी मिळेल. उच्च मूल्यांच्या फलोत्पादनासाठी केलेली स्वतंत्र तरतूद आणि कृषीक्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्मिती निधी  उद्योगाला अत्यंत आवश्यक असलेली चालना देईल. कृषी कर्जाच्या उदिष्टात रु. १८ लाख कोटींवरून २० लाख कोटी रुपयापर्यंत म्हणजे ११% वाढ झाल्याने उद्योगालाही फायदा होईल. आम्ही या उपाययोजनांच्या अंमलबाजवणींची आणि त्यांचा कृषी उद्योग आणि शेतकऱ्यांच्या नफ्यावर होणाऱ्या परिणामाची आतुरतेने वाट पाहत आहोत. या अर्थसंकल्पात घरांना पाणी पुरवठ्याची सोय आणि शौचालय सुविधा पुरविण्यावर स्वतंत्र लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामुळे पल्ंबिंग आणि स्वच्छता व सांडपाणी व्यवस्था विभागातील मागणी वाढेल. याशिवाय, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भांडवली खर्चात ३३% नी वाढ करून १० लाख कोटी रुपयांची तरतूद आणि किफायतशीर घरांसाठी रु. ७९,००० कोटी एवढया निधीची केलेली तरतूद इमारत बांधकाम साहित्य आणि संबंधित क्षेत्रांसाठी उतप्रेरक म्हणून काम करेल.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...