मुंबई: येत्या 5 वर्षात 20 हजार गावं दुष्काळमुक्त करू अशी ग्वाही आज ध्वजारोहणासमयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय परिसरात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी राज्याच्या मुख्य सचिवांसह अनेक मान्यवरही उपस्थित होते.झेंडावंदन झाल्यानंतर राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण जनतेला स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या.राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातला शेतकरी सक्षम बनवण्याकडे आपला प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. याचवेळी सरकारी योजनांच्या माध्यमातून येत्या 5 वर्षात 20 हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा मानस असल्याचं फडणवीस म्हणाले.शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून मुक्त करायचं असल्यासं कर्जाच्या आधारावर शेतीची अर्थव्यवस्था नको असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.तसंच थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनले आहे. 8 महिन्यात 70 हजार कोटींची गुंतवणूक येतेय, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री –
-22 लाख शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा,3 रूपयात तांदूळ, 2 रूपयात गहू. आरोग्य सेवा देण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेची व्याप्तीवाढ
-स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची आता आपल्या सर्वांची जबाबदारी, तोवर आमचे स्वप्न पूर्ण होणार नाही
– दरवर्षी 25 हजार आदिवासी विद्यार्थी नामांकित शाळेत शिकणार, 18 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले
– नागपूर-मुंबई सुपरएक्सप्रेस-वे मुळे कम्युनिकेशन्स क्षेत्रात मोठी क्रांती होणार, राज्यांतर्गत रस्त्यांवरही तितकाच भर
– सिद्ध अपराध दर आठ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता, तो 32 टक्क्यांपर्यंत आणण्यात यश आले. कायदा-सुव्यवस्थेमुळे गुंतवणूक येतेय
– शिक्षणाचा गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न, शिक्षण शुल्क विधेयकाच्या माध्यमातून नफेखोरी करणाऱ्या महाविद्यालयांना चाप बसवणार
– थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य बनले आहे. 8 महिन्यात 70 हजार कोटींची गुंतवणूक येतेय्
– महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती होते आहे. उद्योगातील सरलता, कायद्यातील बदल, परवानाराज संपविला यातून मोठी गुंतवणूक येते आहे
– नवे खरेदी धोरण तयार केले आहे. तीन लाखाच्या वरच्या सर्व वस्तू ई-टेडरिंगच्या माध्यमातून, पारदर्शिता येणार, भ्रष्टाचार कमी होणार:
– सेवा हमी पारित केल्याबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे अभिनंदन करतो. आता संपूर्ण सेवा संचालनालय तयार करतो आहे
– गतिमान शासनासोबत पारदर्शितेसाठी सेवा हमी विधेयक पारित, सेवा मिळविणे हा जनतेचा अधिकार, सेवा देणे ही सरकारची जबाबदारी
– 2016 पर्यंत मागेल त्या शेतकऱ्यांला विजेचे कनेक्शन देणार, मागास भागात 40 हजार वीज कनेक्शन दिले
-दीड लाख शेततळी, एक लाख विहिरी तयार करणार, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात सिंचनाच्या अनेक सोयी करणार
– कर्जावर आधारित नाही, तर गुंतवणुकीवर आधारित शेती याला राज्य सरकारचे प्राधान्य, त्यातूनच शेतकरी समृद्ध होणार
– 25 हजार गावांत दुष्काळ असताना 7000 कोटींपेक्षा अधिक रक्कम राज्य सरकारने दिली
– जलयुक्त शिवारची योजना त्यासाठीच, 300 कोटी रूपये जनतेने उभे केले, ही योजना राज्य सरकारची नाही तर जनआंदोलन बनली याचा आनंद
– शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे खूप कष्ट झेलावे लागले. शेतीचा शाश्वत विकास करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे