पुणे-सीआयडी मालिका पाहून २ महिने प्लान करून २ अल्पवयीन मुलांनी ७० वर्षीय महिलेचा खून करून चोरी केल्याचा धक्कादायक पराक्र उघडकीस आला आहे .३० ऑक्टोबरला हिंगणे खुर्द येथील सायली हायलाईट्स अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. ७ मध्ये चोरी झाली होती. घरामध्ये वयस्कर महिला जखमी आणि बेशुध्द अवस्थेत सापडली. यानंतर ७० वर्षीय शालिनी बबन सोनवणे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते .धक्कादायक बाब म्हणजे तब्यात घेण्यात आलेली मुले 16 आणि 14 वर्षांची असून त्यांनी सीआयडी मालिका पाहून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असताना सिंहगड रोड पोलिसांनी लहान मुलांकडे केलेल्या चौकशीत आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांनी महिलेच्या घरातून चोरलेली रोख रक्कमआणि सोन्याचे दागिने जप्त केले.
घरातील कपाट उघडे असल्याने चोरीच्या उद्देशाने महिलेचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते . सिहंगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकाने आरोपींचा शोध सुरु केला.
परंतु घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा तसेच प्रत्यक्षदर्शी नसल्याने पोलिसांसमोर या गुन्ह्याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते.दरम्यान मंगळवारी तपास पथकाचे पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी यांनी घटनास्थळाजवळ असलेल्या रोकडोबाबा मंदिराजवळ खेळणाऱ्या मुलांकडे चौकशी केली. त्यावेळी मुलांनी सांगितले की, 30 ऑक्टोबर रोजी पाणीपुरी खायला जात असताना, त्यांचे दोन मित्र पाणीपुरी न खाताच गडबडीने घरी गेले. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता दोन मुले गडबडीने जात असल्याचे दिसून आले.त्यांच्याकडे चौकशी करत असताना त्यांनी न गडबडता आणि चेहऱ्यावरती कोणताही हावभाव न दाखवता पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
याचवेळी एकाला घरात चोरी करण्याची सवय असल्याची माहिती मिळाली.आरोपींकडून धक्कादायक खुलासाअल्पवयीन मुलांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली देत धक्कादायक माहिती दिली.आरोपींचे मयत शालीनी बबन सोनवणे यांच्या घरात नेहमी येणेजाणे होते व मयत महिलेकडे कायम खुप पैसे असतात व ते पैसे कोठे ठेवतात याबाबत माहिती होती. सुमारे दोन महिन्यापुर्विच त्यांनी सीआयडी मालिका पाहून चोरी करण्याचा कट रचुन घराची चावी चोरली होती. परंतु मयत या वयस्कर असल्याने त्या घर सोडुन कोठेही जात नव्हत्या. त्यामुळे त्यांना चोरी करता येत नव्हती. त्यानंतर त्यांनी घरात शालीनी या एकटया असताना घरात जावुन चोरी करण्याची योजना आखली तसेच मयत महिलेने विरोध केला तर त्यांना मारण्याची ही तयारी केली होती, अशी माहिती आरोपींनी दिली.असा केला खून३० ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वा सुमारास महिला या घरामध्ये एकटया असल्याची खात्री त्या दोघांनी केली. त्यानंतर घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी महिला या टीव्ही पाहत होती. त्यांच्यासोबत आरोपी देखील टीव्ही पाहू लागले. महिलेचे लक्ष नसताना त्यांना पाठीमागून ढकलुन देवुन त्याचे तोंड व नाक दाबुन खुन केला. त्यानंतर कपाटातील 93 हजार रुपये रोख रक्कम व 67 हजार 500 रुपये रकमेचे सोन्याचे दागिने असा एकुण 1 लाख 60 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेला होता. हा गुन्हा करताना सीआयडी मालिका पाहुन आपल्या हाताचे ठसे कोठे उमटु नये याकरीता हॅण्डग्लोजचा वापर केला होता.\ आरोपींनी चोरलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे पोलीस उप-आयुक्त परीमंडळ 3 पोर्णिमा गायकवाड सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले , पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ , पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, अविनाश कोंडे, अमेय रसाळ, देवा चव्हान, सुहास मोरे, इंद्रजित जगताप, अमोल पाटील, सचिन माळवे, शंकर कुंभार, किशोर शिंदे,सागर भोसले, विकास बादंल विकास पांडोळे, अमित बोडरे यांनी केली. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे हे करीत आहेत.

