एमबीबीएस प्रवेशाच्या नावानं ६५ कोटीला गंडवलं..अखेर ED च्या जाळ्यात सापडलं ..

Date:

मुंबई : ईडीनं सातारा जिल्ह्यातील मायणी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यानं इतरांच्या सहकाऱ्यानं ३५० विद्यार्थ्यांची फसवणूक करत ६५.७ कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप केला आहे. ईडीनं महादेव देशमुख याच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा आरोप करण्यात आला आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशात विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे.वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेत फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं असल्याचं ईडीनं म्हटलं आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था यांच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर मध्ये एमबीबीएसच्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जात होते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची देखील परवानगी घेण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आले मात्र त्यांना प्रवेश देण्यात आले नाहीत किंवा त्यांचे पैसे परत देण्यात आलेले नाहीत.ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातील माहितीनुसार दोन विद्यार्थ्यांच्या पालकांनी वैद्यकीय प्रवेशासाठी १५ ते ४५ लाख रुपये दिले होते. इतर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी किती पैसे दिले यांची माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे. एका महिला पालकानं दिलेल्या माहितीनुसार तिने तिच्या मुलीच्या प्रवेशासाठी ४५ लाख रुपये २०१६ मध्ये दिले होते, त्याची पावती देखील देण्यात आली नव्हती. माझ्या मुलीला प्रवेश देखील देण्यात आला नाही आणि पैसे देखील परत दिले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.पुणे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार करण्याचे प्रयत्न २०१९ मध्ये केले होते. मात्र, त्यामध्ये यश आलं नव्हतं. मात्र, गेल्या वर्षी तक्रार नोंदवली गेल्याची माहिती संबंधित महिलेनं दिली आहे.ईडीच्या चार्जशीटमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेसाठी हवालाच्या माध्यमातून १५ ते २० कोटी रुपयांचा मिळवल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी एका अंगाडिया व्यवसायिकाची मदत घेण्यात आली. त्या व्यावसायिकाला यासाठी ३ ते ४ लाख रुपये कमिशन देण्यात आलं होतं, अशी माहिती अंगाडिया व्यावसायिकाच्या मुलानं दिल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.ईडीनं आरोपपत्रात विद्यार्थ्यांकडून रोख रकमेच्या स्वरुपात पैसे घेण्यात आले आणि ते श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या खात्यात रुग्णालयाची कमाई म्हणून जमा करण्यात आल्याचं दाखवलं गेलं, असं म्हटलं आहे. ही रक्कम महादेव देशमुख, मोहम्मद सिद्दिकी, आणि इतरांच्या खात्यात वळवण्यात आली. वैद्यकीय उपकरणं खरेदी, कंत्राटदारांच्या कामाची रक्कम देणे आणि इतर कारणं दाखवत रक्कम चेकद्वारे काढली गेली आणि वैयक्तिक लाभासाठी, संपत्ती खरेदीसाठी ही रक्कम वापरली गेली, असा दावा ईडीनं केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...