मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोअरसाठी 64 हजार कोटी, तर कोरोना लसिकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूद

Date:

नवी दिल्ली -अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत. आतापर्यंतच्या घोषणांमध्ये आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहेत. अर्थमंत्र्यांनी या वर्षांच्या निवडणुका असणारे 4 राज्य तामिळनाडू, केरळ , बंगाल आणि आसामध्ये रोड इन्फ्रास्ट्रक्चरवर 2.27 लाख कोटी खर्च करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये बंगालपेक्षा जास्त फोकस तामिळनाडूवर केले जात आहे.

बजेटमधील विशेष गोष्टी

शेतकऱ्यांसाठी

  • 2021-22 मध्ये अॅग्रीकल्चर क्रेडिट टार्गेट 16.5 लाख कोटींचे आहे. ऑपरेशन ग्रीन स्कीममध्ये लवकरच खराब होणाऱ्या 22 पिकांचा समावेश केला जाईल.
  • अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडपर्यंत एपीएमसीही पोहोचेल. कोच्ची, चेन्नई, विशाखापट्‌टनम, पारादीप आणि पेटुआघाट सारख्या शहरांमध्ये 5 मोठे फिशिंग हार्बर बांधले जातील. तामिळनाडूमध्ये मल्टीपर्पज सी-विड पार्क बनेल.

गरीबांसाठी

  • वन नेशन, वन राशन कार्डला 32 राज्यांमध्ये लागू केले जाईल. 86% लोकांना यामध्ये कव्हर करण्यात आले आहे.
  • उज्ज्वला योजनेचा फायदा अजून 1 कोटी महिलांपर्यंत पोहोचेल.

इंश्योरेंस-बँकिंग सेक्टरसाठी

  • इंश्योरेंस अॅक्ट 1938 मध्ये बदल होतील. इंश्योरेंस सेक्टरमध्ये FDI ला 49% ने वाढवून 74% केले जाईल.
  • IDBI सह दोन बँक आणि एक पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये निर्गुंतवणूक होईल. यासाठी कायद्यामध्ये बदल होतील. LIC साठीही IPO आणले जाईल.
  • 20,000 कोटी रुपये सरकारी बँकांमध्ये गुंतवले जातील. बँकांना NPA पासून सुटका देण्यासाठी एसेट रिकंस्ट्रक्शन कंपनी आणि एसेट मॅनेजमेंट कंपनी बनवली जाईल.

आरोग्यासाठी

  • 2021-22 मध्ये कोरोना व्हॅक्सीनवर 35,000 कोटी खर्च केले जातील. गरज पडली तर अजून जास्त फंड दिला जाईल.
  • न्यूट्रिशनवरही लक्ष दिले जाईल. मिशन पोषण 2.0 सुरू केले जाईल. पाण्याचा पुरवढा वाढवला जाईल. 5 वर्षात 2.87 लाख कोटी रुपये खर्च होतील.
  • शहरी भागांसाठी जल जीवन मिशन सुरू केले जाईल. शहरी स्वच्छ भारत मिशनवर 1.48 लाख कोटी 5 वर्षांमध्ये खर्च होतील.
  • निमोकोक्कल व्हॅक्सीन देशभरात सुरू केली जाईल. यामुळे 50 हजार बाळांचा दरवर्षी जीव वाचवला जाईल.
  • 64,180 कोटी रुपयांच्या बजेटसह प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना सुरू होईल. हे बजेट नवीन आजारांवरील उपचारांसाठीही असेल.
  • 70 हजार गावांच्या वेलनेस सेंटर्सला यामधून मदत मिळेल. 602 जिल्ह्यांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटल सुरू होतील. नॅशनल सेंटर फॉर डिसीज केंट्रोलला मजबूत केले जाईल.
  • इंटीग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन पोर्टल सुरू केले जाईल. ज्यातून पब्लिक हेल्थ लॅब्सला कनेक्ट केले जाऊ शकेल. 15 हेल्थ इमरजेंसी ऑपरेशन सेंटर्स सुरू केले जातील. 9 बायो सेफ्टी लेव्हल 3 लॅब सुरू होतील.​​​​

आसाम-बंगालच्या टी-वर्कर्स महिलांसाठी 1000 कोटी

अर्थमंत्री म्हणाल्या, ‘पुढची जनगणना पहिली डिजिटल जनगणना असेल. यावर यावर्षी 3768 कोटी रुपये खर्च होतील. गोवा पोर्तुगालपासून स्वातंत्र्याची डायमंड जुबली ईयर साजरे करत आहे. यासाठी 300 कोटी रुपये दिले जातील. आसाम आणि बंगालच्या महिला टी-वर्कर्स आणि त्यांच्या मुलांसाठी 1000 कोटी रुपये दिले जातील.’

शिक्षणासाठी

  • एनजीओ, राज्य सरकार आणि प्रायव्हेट सेक्टरच्या मदतीने 100 नवीन सैनिक शाळांची सुरुवात होईल.
  • लडाखमध्ये हायर एज्यूकेशनसाठी लेहमध्ये सेंट्रल यूनिव्हर्सिटी बनवली जाईल.
  • अदिवासी क्षेत्रांमध्ये 750 एकलव्य मॉडल स्कूलमध्ये सुविधांमध्ये सुधारणा केली जाईल.
  • अनुसूचित जातींसाठी 4 कोटी मुलांसाठी 6 वर्षात 35219 कोटी रुपये खर्च होतील.
  • अदिवासी मुलांसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप दिली जाईल.

पायाभूत क्षेत्रासाठी

  • पायाभूत क्षेत्रासाठी विकास वित्तीय संस्था आवश्यक आहे. यासाठी विधेयक आणले जाईल. यावर 20 हजार कोटी रुपये खर्च केले जातील जेणेकरुन 3 वर्षात 5 लाख कोटी रुपयांचा लँडिंग पोर्टफोलिओ बनू शकेल.
  • सार्वजनिक पायाभूत सुविधांना मॉनेटाइज करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. नॅशनल मोनेटाइजेशन पाइपलाइन लॉन्च होईल. या प्रकरणात प्रगती होत आहे हे पाहण्यासाठी डॅशबोर्ड तयार केला जाईल.
  • नॅशनल हायवेज अथॉरिटीजही आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करतील. रेल्वेही फ्रेट कॉरिडोरला मॉनेटाइज करतील. पुढे जे एअरपोर्ट बनतील, त्यामध्येही मॉनेटाइजेशनवर लक्ष दिले जाईल.

रेल्वेसाठी

  • रेल्वेने नॅशनल रेल प्लान 2030 बनवले आहे. ज्यातून फ्यूचर रेडी रेल्वे सिस्टम बनवले जाऊ शकेल आणि लॉजिस्टिक कॉस्ट कमी केली जाऊ शकेल. जून 2022 पर्यंत ईस्टर्न आणि वेस्टर्न डेडिकेडेट फ्रेट कॉरिडोर तयार होईल. सोमनगर-गोमो सेक्शन पीपीपी मोडमध्ये बनवले जाईल.
  • गोमो-दमकुनी सेक्शनही अशा प्रकारेच बनेल. खड़गपुर-विजयवाड़ा, भुसावल-खड़गपुर, इटारसी-विजयवाड़ामध्ये फ्यूचर रेडी कॉरिडोर बनवले जातील. डिसेंबर 2023 पर्यंत 100% ब्रॉडगेजचे इलेक्ट्रिफिकेशन होईल.
  • विस्टा डोम कोच सुरू होतील जेणेकरुन प्रवाशांना चांगला अनुभव येईल. हाय डेंसिटी नेटवर्क, हाय यूटिलाइज नेटवर्कवर ट्रेन प्रोटेक्शन सिस्टम सुरू केली जाईल. या यंत्रणा देशात बनवल्या जातील.
  • 1.10 लाख कोटी रुपये रेल्वेला देण्यात येत आहेत. 1.07 लाख कोटी रुपये केवळ भांडवली खर्चासाठी आहेत.

मेट्रोसाठी

  • शहरी भागात बस वाहतूक व्यवस्था सुरू केली जाईल. 20 हजार बसेस तयार होतील. यामुळे वाहन क्षेत्रात मदत होईल आणि रोजगार वाढेल.
  • 702 किमी मेट्रो सध्या चालू आहे. 27 शहरांमध्ये एकूण 1016 किमी मेट्रोवर काम सुरू आहे. मेट्रो लाइट्स आणि मेट्रो निओ कमी खर्चासह टीयर-2 शहरांमध्ये सुरू केले जातील.
  • कोच्ची मेट्रोमध्ये 1900 कोटींच्या खर्चाने 11 किमी भाग बनवला जाईल. चेन्नईमध्ये 63 हजार कोटींमध्ये 180 किमी लांब मेट्रो मार्ग बनेल.
  • बंगळुरूमध्येही 14788 रुपयांनी 58 किमी लांब मेट्रो लाइन बनेल. नागपूर 5976 कोटी आणि नाशिकमध्ये 2092 कोटींच्या खर्चातून मेट्रो बनेल.

निवडणूका असणाऱ्या 3 राज्यांसाठी

  • भारतमाला प्रोजेक्टसाठी 3.3 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. रस्त्यांच्या पायाभूत सुविधांसाठी आर्थिक कॉरिडॉर बनवले जातील. तामिळनाडूमध्ये 3500 किमी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत 1.03 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. पुढच्या वर्षी त्याचे बांधकाम सुरू होईल.
  • 1100 किमी नॅशनल हायवे केरळमध्ये बनतील. यानुसार मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोरही बनतील. केरळमध्ये यावर 65 हजार कोटी रुपये खर्च होतील.
  • बंगालमध्ये 25 हजार कोटी रुपयांच्या खर्चाने हायवे बनतील. कोलकाता-सिलीगुड़ी रोडचे अपग्रेडेशन होईल. 34 हजार कोटी रुपये आसाममध्ये नॅशनल हायवेजवर खर्च होतील.

वाहन स्क्रॅपिंग

  • वॉलंटरी वाहन स्क्रैपिंग पॉलिसी आणली जात आहे. यामुळे जुन्या गाड्या हटवल्या जाऊ शकतील. ज्यामुळे प्रदुषण कमी करण्यास मदत मिळेल.
  • गाड्यांची फिटनेस टेस्ट होईल. खासगी वाहन 20 वर्षांनंतर आणि कमर्शियल वाहन 15 वर्षांनंतर स्क्रॅप केले जाऊ शकतील.

भारतीय संघाच्या विजयाचा उल्लेख
सीतारमण म्हणाल्या की, आज भारत हा अपेक्षांचा देश बनला आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की, आशा एक पक्षी आहे जो अंधारातसुद्धा आवाज करतो. टीम इंडियाने नुकतीच ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी बजावली. याने आपल्याला स्मरण करुन दिले की, आपल्याकडे कोणत्या प्रकारची गुणवत्ता आहे. आज, आकडेवारीवरून असे सूचित होते की भारतात कोरोनामुळे सर्वात कमी मृत्यूदर आहे. या सर्व गोष्टी अर्थव्यवस्थेच्या कायापालटचे लक्षण आहेत. आतापर्यंत नकारात्मक GDP च्या आकडेवारीनंतर तीन वेळा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यावेळी नकारात्मक डेटा जगभरातील साथीच्या रोगामुळे आहे.

मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले होते…

आर्थिक सर्वेक्षण तयार करणारे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले होते की, ‘सरकारने लोकांवरील कराचा बोजा कमी करुन खर्च वाढवावा अशी वेळ आली आहे.’ मात्र, खासगी कंपन्या अद्याप खर्च वाढवण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे सरकारला खर्च वाढवावा लागेल. पण सरकारकडे खर्च करण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे कर सवलतीची अपेक्षाही कमी आहे. उलट कोरोना उपकर लागू करण्याची चर्चा, जास्त कमाई करणारे आणि कंपन्यांवर हे लावले जाऊ शकते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...