पुणे:
54 व्या राष्ट्रीय फार्मसी सप्ताहात झालेल्या स्पर्धांमध्ये सलग सहाव्या वर्षी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा)’ ने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. हा सप्ताह ‘इंडियन फार्मास्युटीकल असोसिएशन’ (आयपीए, पुणे शाखा) आणि पुण्यातील विविध फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. बी. सुरेश यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी डॉ. एम. डी. कार्वेकर, डॉ. के. बंगारूराजन, डॉ. आत्माराम पवार, सचिन इटकर आणि प्रशांत हंबर, एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, सचिव लतिफ मगदूम, इरफान शेख, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
या सप्ताहातील 15 स्पर्धांमधील 7 स्पर्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने जिंकल्या. तर 9 स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. पी. ए. इनामदार, लतिफ मगदूम, इरफान शेख, प्रा. व्ही. एन. जगताप यांनी आभार मानले.

