नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2021
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती देताना सांगितले की परिशिष्टात दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनकडे (NCH) ई-कॉमर्सशी संबंधित एकूण 5,12,919 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे 64, 924 तक्रारींची नोंद झाली आहे.
सीसीपीएने 1 ऑक्टोबर, 2021 रोजी एक मार्गदर्शक सूचना जारी केली असून उद्योग संघटनांना वर नमूद केलेल्या नियमांच्या तरतुदींना व्यापक प्रसिद्धी देण्याची आणि ई-कॉमर्स द्वारे वस्तू किंवा सेवा खरेदी करताना ग्राहकांसाठी योग्य तक्रार निवारण यंत्रणा सुनिश्चित करण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन सदस्यांना अनिवार्य करण्याची विनंती केली आहे.

