पुरग्रस्तांच्या मदतीला-नाना पाटेकर, शिरोळमध्ये करणार 500 घरांची बांधणी

Date:

कोल्हापूर : राज्यातील कोल्हापूर-सांगली भागात महापूराने थैमान घातले होते. पूर ओसरत असला तरी येथील परिस्थिती सावरण्यास वेळ लागणार आहे. सध्या विविध संस्था, दानशूर व्यक्ती. सेवाभावी संस्था, राजकीय, सामाजिक, चित्रपट क्षेत्रातील लोक मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. अनेक सिनेसृष्टी आणि टीव्ही कलाकारांनीही खूप मदत केली आणि करत आहेत. नाना पाटेकर शिरोळ पुरग्रस्तांची भेट घेण्यासाठी आले होते. येथे नागरिकांना यथोचित भोजन देण्यात आले. दरम्यान तेथील महिलांनी आपले दुःख नानांसमोर व्यक्त करण्यासाठी त्यांना घेराव घातला. नानांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

नाना पाटेकर म्हणाले, ‘आम्ही शिरोळ येथे 500 घरे बांधणार आहोत. त्यानंतर टाकळीवाडीलाही 3000 घरे बांधली जाणार आहेत. तसेच कोल्हापूर सांगलीच्या इतर विभागातही घरे बांधली जाणार आहेत. सरकारसोबत मिळून हे काम मी करणार आहे. यामध्ये कुणाही एकाचे श्रेय नाही आणि त्याने ते घेऊही नये. शासनासोबत राहून नागरिकांना सर्व मदत केली जय. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये.’ असेही नाना पाटेकरांनी सांगितले. याबरोबरच नानांनी इतर नागरिकांनाही मदतीचे आवाहन केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...

पत्रकार विक्रांत आढाव यांचे निधन

पुणे : प्रसिद्ध क्रीडा पत्रकार विक्रांत आढाव...

विधिमंडळासाठी ‘राष्ट्रीय विधिमंडळ निर्देशांक’ हवा 

दिल्ली विधानसभेचे सभापती विजेंदर गुप्ता यांचे मत; १५ व्या...