पुणे-शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि सोबतच ग्रामीण भागातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र आजही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने खडकवासला१०० टक्के भरले आहे. तर पुढील दोन दिवस पावसाचा इशारा असल्याने खडकवासला नवीन मुठा उजवा कालव्यातून ९०५ क्यूसेक आणि मुठा नदीत सांडव्यातून ४७०८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात सुरू आहे. तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या ४ धरणाचा पाणीसाठा ५० टक्के झाला आहे.
खडकवासला ५ मिमी, – पानशेत २५ मिमी, वरसगाव २१ मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३० मिमी पावसाची नोंद झाली तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १४.६८ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी हा साठा ९.०८ टीएमसी होता. मागील वर्षापेक्षा हा ५.५० टीएमसी जास्त साठा आहे.
Subject: Khadakwasala Complex gauges 14.7.2022/5.00 pm,
Rain(mm/Total/TMC/%/Inflow)
1)Khadakwasala –
5/322/1.97/100%/+32
NMRBC- 905
ww-4708
Total water released over spillway of Khadakwasala dam =1.85 TMC till now.
2)Panshet– 25/1134/5.34/50.14%/+207
3)Warasgaon–
21/1091/6.07/47.37%/+257
4)Temghar–
30/1335/1.29/34.86%/+76
Total Inflow of 4 Dams= 0.57 TMC
Total content of 4 Dams-
14.68 TMC/50.35%
Last year-
9.08 TMC/ 31.17%

