नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र. 10 मध्ये लसीकरण केंद्र सुरू
पुणे-पुण्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 16 लाख लोकांना लास देण्यात येणार असून आतापर्यंत १५८ केंद्रांतून ५ लाख ८० हजार लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे . आपणही लस घ्या,कोरोनावर मात करण्यासाठी लस हेच आपल्याकडे असलेले सर्वात प्रभावी शस्त्र आहे,मात्र त्याबरोबर निर्बंधाच्या शब्दाने घालून दिलेले नियमही पाळणे तेवढेच गरजेचे आहे असे प्रतिपादन आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी येथे केले .नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र. 10 मध्ये लसीकरण केंद्र सुरू करम्यात आले .या केंद्राचे उद्घाटन महापौर आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले . यावेळी ते बोलत होते .
ते म्हणाले ,’ वेडेपाटील हे गेल्या वर्षातल्या मार्च महिन्यात कोरोना आला तसा माझा प्रभाग माझी जबाबदारी ओळखून येथील नागरिकांना गरजूंना महामारीच्या काळात मदत करावयास सातत्याने पुढे राहिले आहेत .दुसऱ्या लाटेत आता त्यांना लशी ची साथ मिळणार आहे,ते याभागातील नागरिकांसाठी एवढे काम करत आहेत याबाबत कौतुकाचे शब्द अपुरे पडतील . पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. 10 मधील बावधन खुर्द, भुसारी कॉलनी, शांतिबन चौक परिसरात एकही सरकारी दवाखाना नसल्याने या परिसरातील नागरिकांना कोरोनावरील रोग प्रतिबंधक लस (कोव्हीशिल्ड) घेणे खूप अवघड होत असल्याने नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी माझ्यासह पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व आरोग्य प्रमुख यांच्या सोबत केलेल्या पाठपुराव्यास आज यश आले असून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, व्हॅले व्हिस्ता सोसायटी शेजारी, एल.एम.डी. चौक, बावधन खुर्द. येथे आणि सावरकर हॉल, उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड.
या दोन ठिकाणांवर ४५ वयावरील लोकांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राची सुरुवात आपण करत आहोत.या केंद्रांची वेळ सळाळी ९ ते सायं ५ वा पर्यंत असणार आहे तसेच रविवारी बंद असेल. नागरिकांनी याचा फायदा घ्यावा .
याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कदम, आरोग्य अधिकारी डॉ.अंजली टिळेकर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील,नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका डॉ.श्रद्धा प्रभुणे- पाठक, रमेश रोठे,मिलिंद अलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

