कर्नाटकच्या तनिश मॅथ्युचा विक्रमासह सुवर्णवेध
महाराष्ट्राच्या त्रिशा कारखानीस, साध्वि धुरी, केनिशा गुप्ता यांना सुवर्णपदक
पुणे, 5 जुलै 2017: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 44व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रेने वीरधवल खाडेचा नऊ वर्षापुर्वीचा विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक संपादन केले. तर कर्नाटकच्या तनिश मॅथ्युने गोव्याच्या झेविअर डिसुझाचा 2015 सालचा विक्रम मोडून सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या त्रिशा कारखानीस, साध्वि धुरी व केनिशा गुप्ता यांनी सुवर्णपदक पटकवले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 100मी बटरफ्लाय प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रेची चमकदार कामगिरी केली. मिहिरने 55.65सेकंद वेळ नोंदवत 2008सालचा विरधवल खाडेचा नऊ वर्षापुर्वीचा 55.96सेकंदाचा विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक पटकावले. गोवाच्या झेविअर डिसुझाने 57.17सेकंद तर कर्नाटकच्या राहूल एम याने 57.58सेकंदासह अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगटात कर्नाटकच्या तनिश मॅथ्युने 58.37सेकंद वेळ नोंदवत गोव्याच्या झेविअर डिसुझाचा 2015 सालचा 59.23सेकंदाचा विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक पटकावले. कर्नाटकच्या प्रसिधा कृष्णा व मध्यप्रदेशच्या परम बिरथारे यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

800मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या 13-14 वयोगटात कर्नाटकच्या खुशी दिनेशने 9.42.12सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले तर कर्नाटकच्या पुजीता मुर्ती व आसामच्या आस्था चौधरी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
200मी बटरफ्लाय प्रकारात मुलींच्या15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या त्रिशा कारखानीसने 2.24.46सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. राजस्थानच्या फिरदुश कयामखानी व आसामच्या अनुभूती बरूआ यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात कर्नाटकच्या साची जी हीने 2.33.52सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले. तर दिल्लीच्या रिंकी बोरदोलोई व महाराष्ट्राच्या सई पाटील यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
100मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्राच्या त्रिशा कारखानीसने आपल्या सुवर्ण कीमगिरीत सातत्य राखत 1.07.90सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तर ओडीशाच्या प्रत्येशा राय व कर्नाटकच्या झानती राजेश यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक संपादन केले. मुलींच्या 13-14 वयोगट दिल्लीच्या तनिशा मावीयाने 1.07.77सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले तनिशाचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. तर कर्नाटकच्या सुवाना भास्कर व गोव्याच्या शृंगी बांदेकर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
50मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात उत्तर प्रदेशच्या आलिया सिंगने 35.47सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तर कर्नाटकच्या सलोनी दलाल व रिध्दी बोहरा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक संपादन केले. मुलींच्या 13-14 वयोगटात तामिळनाडूच्या अदिती बालाजीने 36.69सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले. अदितीचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. कर्नाटकच्या तर मधुरा बी.जी व रचना राव यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
50मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात तमिळनाडूच्या दानुष एस याने 30.76सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. कर्नाटकच्या मानव दिलिप व आसामच्या मिलांथो दत्ता यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगटात पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडलने आपल्या सुवर्ण कामगिरीत सातत्य राखत 33.07सेकंद वेळेसह स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक पटकावले. तामिळनाडूच्या अथिश एम व कर्नाटकच्या हितेन मित्तल यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
50मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या साध्वी धुरीने 27.89सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. साध्वी एम.एम.सी.सी महाविद्यालयात बारावी इयत्तेत शिकत असून हर्मनी अॅकेवॅटीक अकादमी येथे प्रशिक्षक भुपेंद्र आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते तामिळनाडूच्या प्रिती बी व मध्य प्रदेशच्या अॅनी जैन यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात महाराष्ट्रच्या केनिशा गुप्ताने आपल्या सुवर्ण कामगिरीत सातत्य राखत 27.94सेकंद वेळेसह स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक संपादन केले. केरळच्या लायाना उमेर व बिहारच्या माही राज यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक संपादन केले.
50मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या मिहिर आंब्रेने आपल्या सुवर्ण कामगिरीत सातत्य राखत 24.41सेकंदासह सुवर्णपदक संपाद केले तर महाराष्ट्राच्याच निल रॉयने 24.57सेकंदासह रौप्य पदक पटकावले. दिल्लीच्या समित सेजवालने 24.63सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगटात तामिळनाडूच्या विकास पी याने 24.76सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तर हरियाणाच्या वीर खाटकर व कर्नाटकच्या प्रसिधा कृष्णा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
800मी फ्रीस्टाईल मुली(13-14 वयोगट)- 1. खुशी दिनेश(कर्नाटक, 9.42.12से), 2. पुजीता मुर्ती(कर्नाटक, 1.47.77से), 3. आस्था चौधरी(आसाम, 9.48.67से)
200मी बटरफ्लाय मुली(15-17 वयोगट)- 1.त्रिशा कारखानीस(महाराष्ट्र, 2.24.46से), फिरदुश कयामखानी(राजस्थान,2.32.25से), 3.अनुभूती बरूआ(आसाम,2.32.37से)
200मी बटरफ्लाय मुली(13-14 वयोगट)- 1. साची जी(कर्नाटक,2.33.52से), 2. रिंकी बोरदोलोई(दिल्ली, 2.33.68से) 3.सई पाटील(महाराष्ट्र, 2.36.71से)
100मी बॅकस्ट्रोक मुली(15-17 वयोगट)- 1.त्रिशा कारखानीस(महाराष्ट्र, 1.07.90से), 2.प्रत्येशा राय (ओडीशा,1.09.11से), 3.झानती राजेश(कर्नाटक,1.09.52से)
100मी बॅकस्ट्रोक मुली(13-14 वयोगट)- 1.तनिशा मावीया(दिल्ली,1.07.77से), 2.सुवाना भास्कर(कर्नाटक,1.08.95से), 3. शृंगी बांदेकर(गोवा,1.09.31से)
100मी बटरफ्लाय मुले(15-17 वयोगट)- 1. मिहिर आंब्रे(महाराष्ट्र,55.65से), 2. झेविअर डिसुझा (गोवा,57.17से), 3. राहूल एम(कर्नाटक,57.58से)
100मी बटरफ्लाय मुले(13-14 वयोगट)- 1. तनिश मॅथ्यु(कर्नाटक, 58.37से), 2.प्रसिधा कृष्णा(कर्नाटक, 59.55से), 3.परम बिरथारे(मध्यप्रदेश, 1.00.56से)
50मी ब्रेसस्ट्रोक मुली(15-17 वयोगट)- 1. आलिया सिंग(उत्तर प्रदेश,35.47से), 2. सलोनी दलाल(कर्नाटक, 35.59से), 3.रिध्दी बोहरा(कर्नाटक, 35.67से)
50मी ब्रेसस्ट्रोक मुली(13-14 वयोगट)- 1.अदिती बालाजी(तामिळनाडू,36.69से), 2. मधुरा बी.जी(कर्नाटक,37.05से), 3.रचना राव(कर्नाटक, 37.31से)
50मी ब्रेसस्ट्रोक मुले(15-17 वयोगट)- 1. दानुष एस(तमिळनाडू, 30.76से), 2. मानव दिलिप(कर्नाटक, 30.91से), 3. मिलांथो दत्ता(आसाम, 31.02से)
50मी ब्रेसस्ट्रोक मुले(13-14 वयोगट)- 1. स्वदेश मोंडल(पश्चिम बंगाल, 33.07से), 2. अथिश एम(तामिळनाडू,33.79से), 3.हितेन मित्तल(कर्नाटक, 33.81से)
50मी फ्रीस्टाईल मुली(15-17 वयोगट)- 1. साध्वी धुरी(महाराष्ट्र, 27.89से), प्रिती बी(तामिळनाडू, 28.13से), 3. अॅनी जैन(मध्य प्रदेश, 28.16से)
50मी फ्रीस्टाईल मुली(13-14 वयोगट)- 1. केनिशा गुप्ता(महाराष्ट्र, 27.94से), 2. लायाना उमेर(केरळ, 28.60से), 3.माही राज(बिहार, 28.60से)
50मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)- 1. मिहिर आंब्रे(महाराष्ट्र, 24.41से), 2. निल रॉय(महाराष्ट्र, 24.57से), 3. समित सेजवाल(दिल्ली, 24.63से)
50मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1. विकास पी(तामिळनाडू, 24.76से),2. विर खाटकर(हरियाणा, 25.74से), 3. प्रसिधा कृष्णा(कर्नाटक, 25.91से)

