पुणे, 2 जुलै 2017: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 44व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेस उद्यापासून(3जुलै)प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर झाला असून मुलांच्या संघाचे नेतृत्व मुंबईच्या नील रॉय याच्याकडे, तर मुलींच्या संघाचे त्रिशा कारखानिसकडे सोपविण्यात आले आहे.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे दि.3 ते 6 जुलै 2017 या कालावधीत हि स्पर्धा पार पडणार आहे. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात नील रॉय, वेदांत खांडेपारकर, अॅरन फर्नांडिस, धनायुश राणींगा, सुश्रुत कापसे, मिहीर आंब्रे, दिवीज टेकावडे, प्रसाद कंडुल, सत्यजित कुमठेकर, अनिकेत चव्हाण, करण धर्माधिकारी, अभिनंदन दळवी, आर्यन केदारे, अथर्व देशमुख यांचा तर मुलींच्या गटात त्रिशा कारखानीस, रायना सलढाणा, जिस्पा दोशी, युक्ता वखारीया, साध्वी धुरी, शॅरन साजु, आर्या राजगुरू, साची शेट्टी, ऋतुजा तळेगावकर, सिद्धी कोतवाल, युगंधरा शिर्के, कारवी गायकवाड, अहिल्या चव्हाण यांचा समावेश आहे.
14 वर्षाखालील संघात मुलांच्या गटात आर्यन भोसले, वेदांत बापना, अमान सिक्का, सफवान शेख, सुदर्शन हस्तक, श्रीश मौलिक, अंगथ सादनाह, साहिल गणगोटे, मनिष खोमणे, आर्यन वेर्णेकर, यश गुल्हाने, शिवाजी राऊत, यश सोनाक, ध्रुव पटेल, कृष्णा गडाख, जरेश घाग, ऋग्वेत पाटील यांचा तर, मुलींच्या गटात केनिशा गुप्ता, आकांक्षा शहा, सई पाटील, आएका चात्रा, सिया बिजलानी, अनन्या पांडे, ख़ुशी पटेल, अंतरा कोठारे, सुहानी बक्षी, वैष्णवी मोरे, शाल्मली वाळुंजकर, रिया ताओरी, कनिष्का शौकीन, पायल श्रीराव, हिमानी फडके यांचा समावेश आहे. तसेच, राष्ट्रीय कुमारांच्या स्पर्धेदरम्यान वॉटरपोलो स्पर्धादेखील होणार आहे.
स्पर्धेचे उदघाटन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेतील महाराष्ट्र संघाची यादी खालीलप्रमाणे
17वर्षाखालील संघ: मुले: नील रॉय, वेदांत खांडेपारकर, अॅरन फर्नांडिस, धनायुश राणींगा, सुश्रुत कापसे, मिहीर आंब्रे, दिवीज टेकावडे, प्रसाद कंडुल, सत्यजित कुमठेकर, अनिकेत चव्हाण, करण धर्माधिकारी, अभिनंदन दळवी, आर्यन केदारे, अथर्व देशमुख;
मुली: त्रिशा कारखानीस, रायना सलढाणा, जिस्पा दोशी, युक्ता वखारीया, साध्वी धुरी, शॅरन साजु, आर्या राजगुरू, साची शेट्टी, ऋतुजा तळेगावकर, सिद्धी कोतवाल, युगंधरा शिर्के, कारवी गायकवाड, अहिल्या चव्हाण;
14 वर्षाखालील संघ: मुले: आर्यन भोसले, वेदांत बापना, अमान सिक्का, सफवान शेख, सुदर्शन हस्तक, श्रीश मौलिक, अंगथ सादनाह, साहिल गणगोटे, मनिष खोमणे, आर्यन वेर्णेकर, यश गुल्हाने, शिवाजी राऊत, यश सोनाक, ध्रुव पटेल, कृष्णा गडाख, जरेश घाग, ऋग्वेत पाटील;
मुली: केनिशा गुप्ता, आकांक्षा शहा, सई पाटील, आएका चात्रा, सिया बिजलानी, अनन्या पांडे, ख़ुशी पटेल, अंतरा कोठारे, सुहानी बक्षी, वैष्णवी मोरे, शाल्मली वाळुंजकर, रिया ताओरी, कनिष्का शौकीन, पायल श्रीराव, हिमानी फडके

