पुणे परिमंडलात वीजबिलांपोटी ४२५ कोटींची थकबाकी

Date:

आज व उद्या वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

पुणे, दि. २७ ऑगस्ट २०२१: प्रामुख्याने वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच संपूर्ण आर्थिक मदार असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वाढत्या थकबाकीमुळे डबघाईस आली आहे. सद्यस्थितीत पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १० लाख ३४ हजार ७०४ ग्राहकांकडे ४२५ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाईला वेग देण्यात आला आहे.

दरम्यान सार्वजनिक सुटीच्या दिवशी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २८) व रविवारी (२९) कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. यासोबतच घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरात घरगुती ४ लाख ४० हजार २२६ ग्राहकांकडे १३७ कोटी ८१ लाख, वाणिज्यिक ७३ हजार ७२८ ग्राहकांकडे ५१ कोटी ४६ लाख, औद्योगिक ५ हजार ५८९ ग्राहकाकंडे ७ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये घरगुती १ लाख ७५ हजार ९६८ ग्राहकांकडे ५८ कोटी ८५ लाख, वाणिज्यिक २८ हजार २०० ग्राहकांकडे २३ कोटी ९४ लाख व औद्योगिक ५ हजार ६८४ ग्राहकांकडे ११ कोटी ६६ लाख रुपये थकीत आहेत. तर महावितरणच्या मुळशी, राजगुरुनगर व मंचर विभागात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ३ लाख ५ हजार ३०९ ग्राहकांकडे १३३ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी आहे.

वारंवार आवाहन करून देखील थकबाकीचा भरणा होत नसल्याने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला महावितरणने आता मोठा वेग दिला आहे. त्यामुळे दि. २८ व २९ रोजी  सार्वजनिक सुटीच्या दिवशी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...