४२. १ किमी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन मार्गास स्व. प्रल्हाद सावंत यांचे नाव

Date:

पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या रूपाने न्हेणारे मॅरॅथॉन मॅन पुणे अथेलेटिक्स चळवळीचे जनक क्रीडा संघटक व क्रीडा पत्रकार  स्व प्रल्हाद सावंत यांची स्मृती जागती ठेवण्यासाठी आज पुण्यातील ४२.१ किमी लांबीच्या मार्गास   मॅरॅथॉन मॅन पुणे अथेलेटिक्स चळवळीचे जनक क्रीडा संघटक स्व प्रल्हाद सावंत पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन मार्ग असे नामकरण करण्याचा भावनिक कार्यक्रम आज संपन्न झाला. सणस मैदान येथील सणस पुतळ्याजवळ नाम फलकाचे अनावरण पुण्यनगरीचे महापौर मा. मुरलीधर  मोहोळ व जेष्ठ गांधीवादी नेते  मा. उल्हास पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या पुढाकाराने या संदर्भातला ठराव पुणे महानगरपालिकेत एक मताने मंजूर करण्यात आला. 

या प्रसंगी पुणे मनपा गटनेते आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले की , प्रल्हाद सावंत हे क्रीडा विश्वाला वाहून घेतलेले व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला.  अश्या कर्तबगार क्रीडा संघटक व क्रीडा पत्रकाराचे नाव मॅरेथॉन मार्ग म्हणून द्यावे अशी कल्पना माझ्या मनात आली आणि महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी त्यास एक मताने पाठिंबा दिला ही विशेष बाब मानली पाहिजे. या संपूर्ण ४२. १ किमी मार्गास नाव देणे ही जगातील पहिलीच घटना असेल त्यांच्या स्मृतीमुळे बाल युवक व तरुणांमध्ये मॅरेथॉन बद्दलचे प्रेम अधिक वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गरीब कुटुंबातील तरुण परिस्थितीशी झगडत महान कार्य उभे करू शकतो. त्याचे प्रल्हाद सावंत मूर्तीमंत उदाहरण आहे असे ते म्हणाले.  
पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले की, प्रल्हाद सावंत हे सर्वांशी मिळून मिसळून राहणारे क्रीडा व्यक्तिमत्व होते. तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी या क्रीडानगरीत आंतराष्ट्रीय मॅरेथॉन सुरु केली. त्याचा व्याप वाढवला तो प्रल्हाद सावंत यांनी पुण्याच्या वैभवात या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमुळे सदैव भर पडत गेली. शेकडो आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. जागतिक व आंतरराष्ट्रीय खेळाच्या नकाशावर पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनचे नाव ठळकपणे नेण्यात प्रल्हाद सावंत यांचा मोठा वाटा आहे. पुणे महानगरपालिकेत सत्ता बदल झाला तरी देखील चांगले काम हे नेहमीच कौतुकाची बाब ठरत असते त्यामुळे सत्ता बदल झाला तरी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन अखंडपणे चालू राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ४२. १ किमीच्या मार्गावर ४० ठिकाणी त्यांच्या नावाचे फलक लावण्याचे नियोजन आम्ही लवकरच करू असे शेवटी ते म्हणाले. 
यावेळी जेष्ठ गांधीवादी नेते उल्हास पवार म्हणाले की , प्रल्हाद सावंत तळागाळातला कार्यकर्ता होता. त्याचे क्रीडा प्रेम अफलातून होते. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात क्रीडा स्पर्धा असली की तेथे आवर्जून जायचे. एवढेच नव्हे तर त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आठ ऑलम्पिक स्पर्धेचे वार्तांकन केले. आठ ऑलम्पिक स्पर्धाचे वार्तांकन करणारे कदाचित ते पहिले मराठी पत्रकार असेल. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन हे त्यांचे जीवन धैय बनले होते. आणि त्यासाठी त्यांनी पूर्णपणे वाहून घेतले होते. अश्या प्रकारे त्यांची स्मृती जतन करण्यासाठी संपूर्ण मॅरेथॉन मार्गाला त्यांचे नाव देणे हि जगातील एकमेव घटना असावी असे आवर्जून नमूद करून यासाठी आबा बागुलांना त्यांनी विशेष धन्यवाद दिले. 
पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्थ ऍड अभय छाजेड म्हणाले की, प्रल्हाद सावंत हे व्यक्ती नव्हे तर संस्था बनले होते. मैत्रीला जगणारे  हे उमदे व्यक्तिमत्व होते. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनची तारीख निश्चित करून त्या नंतर संपूर्ण काळ अत्यंत बारकाईने नियोजन करून सर्व  प्रकारच्या,सर्व थरातील लहान थोरांना एकत्र आणून पुणे इंटरनॅशनल स्पर्धा यशस्वी करणं यासाठी ते अहोरात्र झटायचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमुळे  तयार झाले. त्याचे श्रेय नक्कीच त्यांना जाते. 
पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी प्रल्हाद सावंत यांच्या आठवणी जागवून म्हंटले की , प्रल्हाद सावंत हे सतत हसतमुख व्यक्तिमत्व होते तसेच क्रीडा नेतृत्व होते. पुण्याला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या नकाशावर त्यांनी ठळकपणे नेले त्यात सातत्य राखले कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग कसा काढायचा क्रीडा स्पर्धा यशस्वी कशी करायची हे प्रल्हाद सावंतांकडून सर्वानी शिकायला हवे. त्यांच्या निधनांनंतर देखील पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन त्याच जोमाने पुढे चालू ठेवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. याप्रसंगी डॉ सतीश देसाई, माजी आमदार दीप्ती चवधरी यांची भाषणे झाली याप्रसंगी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन  ट्रस्टचे विश्वस्त व सचिव रोहन मोरे, रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, पुणे जिल्हा हाऊसची ऑथेंटिक्स संघटनेच्या  सचिव गुर्बन्स कौर, वैदकीय पथक प्रमुख डॉ राजेंद्र जगताप, मराठा महा संघाच्या केंद्रीय समन्वयक राजेंद्र कुंजीर, ऍड निकम, स्मिता शिरोळे यांसह अनेक छत्रपती व अर्जुन पुरस्कार विजेते, क्रीडा संघटक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल यांनी आभार मान

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक नूतन वास्तूचे उद्घाटन बारामतीत

बारामती: विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या ‘शरदचंद्र पवार...

वार्षिक स्नेहसमेलनातून विद्यार्थ्यांच्या जीवनमूल्यांचा विकास.,,,, डॉ. काशिनाथ बांगर.

पुणे:शाळेतील स्नेहसंमेलन हा एक सांस्कृतिक कार्यक्रम असून विद्यार्थ्यांना कलाविष्कार...

भाजपा ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

पिंपरी, पुणे (दि. २७ डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड शहरातील...

आंदेकर पुन्हा येणार ..उमेदवारी अर्ज भरायला ..आज अपूर्णच राहिले काम

पुणे-आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या...