नवी दिल्ली-
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींना कोरोनाची लागण झाल्याची संख्या 4 झाली आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयातील अनेक कर्मचारीही या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे की, निवृत्त होत असलेल्या एका न्यायाधीशाच्या फेयरवेल पार्टीमध्ये हे संक्रमण पसरले आहे.
3000 मधून 150 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट आहे पॉझिटिव्ह
ANI न्यूज एजेंसीच्या रिपोर्टनुसार, सुप्रीम कोर्टात 3000 कर्मचारी आहेत. यामधून 150 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट आतापर्यंत पॉझिटिव्ह आला आहे. CJI एनव्ही रमन्नासह 32 न्यायाधीशांमधून चार न्यायाधिश कोविड पॉझिटिव्ह झाल्याने आता येथे पॉझिटिव्हिटी रेट 12.5% झाला आहे.
3 जानेवारीपासून स्टार्ट केली होती व्हर्चुअल हियरिंग
दिल्लीत कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रामण्णा यांनी 2 जानेवारी रोजी केवळ व्हर्चुअल हियरिंगच्या माध्यमातूनच प्रकरणांची सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते. ही व्यवस्था 3 जानेवारीपासून पुढील दोन आठवड्यांसाठी लागू करण्यात आली होती. यादरम्यान न्यायाधीशांना त्यांच्या घरूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यास सांगण्यात आले होते. ही सर्व कसरत न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी करण्यात आली होती.
दिल्लीमध्ये 60 हजारांपेक्षा जास्त केस
दिल्लीमध्ये सलग नवीन प्रकरणे वाढत आहेत. रविवारी 22,751 नवीन प्रकरणे सापडली. तर शनिवारी 20,181 नवीन प्रकरणे मिळाली होती. नॅशनल कॅपिटलमध्ये रविवारी 10,179 रुग्ण बरे देखील झाले. मात्र कोरोनामुळे 17 लोकांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. आता राज्यात एकूण 60,733अॅक्टिव्ह केस झाल्या आहेत. दिल्लीमध्ये पॉझिटिव्ह रेट देखील वाढून 24% पोहोचला आहे.