‘आयत्या ‘ वेळी 364 कोटी रुपयांच्या निविदा एकमताने मंजूर

Date:

1580 कंट्राटी सुरक्षारक्षक आणि समाविष्ट गावात ड्रेनेज

पुणे – आयत्यावेळी कोट्यावधींचे टेंडर असलेले विषय आणून ते मंजूर करण्यात आघाडीवर असलेल्या स्थायी समितीत आज आज प्रशासनाकडून ऐनवेळी आलेली समाविष्ट गावातील 323 कोटी 47 लाख रुपयांची निविदा एकमताने मान्य करण्यात आली . तसेच सुरक्षा रक्षक पुरविण्याची एका आमदाराशी संबधित कंपनीची 41 कोटी रुपयांची निविदाही ऐनवेळी आणून ‘एकमताने’ मान्य केलीपुन्हा भाजपच्या या राजवटीत ठेकेदारांची चंगळ आणि रोजंदारीसाठी वणवण करणाऱ्यांसाठी ‘मंगळ’ हेच धोरण अंमलात आणले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. .विशेष म्हणजे यासंदर्भात कुठेही तक्रारी , विचारणा , आरोप प्रत्यारोप झाले नाहीत .आयत्यावेळी प्रस्ताव आणून त्यावर जास्त चर्चा न घडू देता ते मंजूर करवून घेण्याचा धडाका सुरूच असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

महापालिकेमध्ये 2017 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 11 गावांमध्ये ड्रेनेज लाईन तसेच मांजरी आणि केशवनगर येथे एसटीपी प्लांट उभारण्याची 392 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. एसटीपी प्लांटसाठी जागा ताब्यात नाही. तसेच निविदेच्या अटीशर्ती या एका ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आल्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका देखिल दाखल केली आहे. या निविदेवरुन एवढे आरोप प्रत्यारोप होत असताना प्रशासनाने ही निविदा आज ऐनवेळी मान्यतेसाठी ठेवली. ती सर्व पक्षांनी एकमताने मान्य केली. विशेष असे की ज्या ठेकेदारावरून आक्षेप घेण्यात आला होता, तीच ठेकेदार कंपनी मे. खिलारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. व एस.ए. इन्फ्रा या कंपनीला मिळाली. या कंपनीने 7. 80 टक्के कमी दराने निविदा भरली आहे.

यापाठोपाठ महापालिकेची विविध क्षेत्रिय कार्यालये, मंडई, मनपा भवन, मध्यवर्ती कोठी आदी ठिकाणी सुरक्षा विभागामार्फत बहुद्देशीय कामगार पुरविण्याची 41 कोटी रुपयांची निविदाही मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली होती. हे सुरक्षा रक्षक पुरवण्यासाठी मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीची निविदा सर्वात कमी रकमेची आहे. ही निविदाही एकमताने मंजुर करण्यात आली, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे दाखल आणि मान्य झाले प्रस्ताव

– प्रयेजा सिटी ते वारजे येथे महामार्गालगत असलेल्या सेवा
रस्त्यावरील नाल्यावर पुल बांधण्यासाठी सुमारे 1 कोटी 62 लाखाची निविदा मंजुर

– देवाची उरुळी- फुरसुंगी येथील कचरा प्रक्रीया प्रकल्पात तयार होणार्‍या लिचेटवर प्रक्रीया करण्यासाठी सुमारे ९५ लाख रुपयांची निविदा मंजुर

– स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण आणि प्रकल्प व्यवस्थापनाकरीता सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.

– कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथील सर्पोद्यान,
वन्य प्राणी अनाथालय यांचे देखभालीचे कामकाज भारतीय सर्पविज्ञान संस्थेला देण्यास मान्यता

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...