पुणे, 30 जून 2017: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 34व्या ग्लेनमार्क सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या उत्कर्ष गौरने पाच तर संजिती सहा व वेदिका अमिन यांनी चार सुवर्णपदके पटकावले. महाराष्ट्र संघाने 247गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 100मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलांच्या गटात पश्चिम बंगालच्या साहिल लस्करने 1.05.93सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तर मुलींच्या गटात कर्नाटकच्या निना व्यंकटेशने 1.10.87 सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले तर महाराष्ट्राच्या पलक धामीने 1.11.11 सेकंद वेळेसह रौप्य पदक मिळवले.
200मी मिडले प्रकारात मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या उत्कर्ष गौरने 2.42.91सेकंद वेळ नोंदवत शॉन गांगुलीचा 2015सालचा 2.43.13 सेकंद वेळेचा विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक संपादन केले. याआधी उत्कर्षने लक्षवेधी कामगिरी करत 50मी बॅकस्ट्रोक प्रकारात 34.30सेकंद वेळ नोंदवून याआधीचा आपलाच ३४.८८ चा विक्रम मोडीत काढत एक नवा विक्रम नोंदविला. याशिवाय उत्कर्षने 50मी बॅकस्ट्रोक, 50मी फ्रीस्टाईल, 100मी फ्रीस्टाईल, 50मी बटरफ्लाय या प्रकारांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली आहे. उत्कर्ष हा दिल्ली पब्लिक स्कुल मध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून हार्मनी क्लब येथे प्रशिक्षक नरेंद्र आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
50मी बटरफ्लाय प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्रच्या संजिती सहाने 30.17सेकंद वेळ नोंदवत नव्या विक्रमासह सुवर्णपदक पटकावले तर महाराष्ट्रच्याच पलक धामीने 30.64सेकंद वेळेसह रौप्य पदक पटकावले. याआधी संजितीने सकाळच्या प्राथमिक फेरीत स्वतःचाच 31.17 सेकंदाचा विक्रम मागे टाकला. संजितीचे हे वैयक्तिक गटात पाचवे सुवर्णपदक आहे. याआधी तीने या स्पर्धेत 50मी फ्रीस्टाईल आणि 50मी बटरफ्लाय, 100मी बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदकसह तीन विक्रम नोंदवले आहेत. संजिती मुंबई येथे आबाबाई पेटीट स्कुल मध्ये सातवी इयत्तेत शिकत असून खार जिमखाना येथे प्रशिक्षक देवदत्त लेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलांच्या गटात गोव्याच्या शॉन गांगुलीने 28.61सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले.
50मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात मुलांच्या गटात आसामच्या ख्यातीमान कश्यपने 39.03सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले तर मुलींच्या गटात आसामच्याच जान्हवी कश्यपने 43.11सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या संजना पालाने 43.45सेकंद वेळेसह कांस्य पदक पटकावले.
100मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या वेदिका अमिनने 1.02.77सेकंद वेळ नोंदवत 2010 सालाचा कर्नाटकच्या माल्विका व्ही हीचा 1.03.70 सेकंदाचा विक्रम मोडीत काडत सुवर्णपदक संपादन केले. वेदिकाने या स्पर्धेत वैयक्तीक प्रकारात एकूण चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तसेच तीने 50मी ब्रेसस्ट्रोक व 50मी फ्रीस्टाईल प्रकारात, 100मी ब्रेसस्ट्रोक व 100मी फ्रीस्टाईल प्रकारात 4 नव्या विक्रमांची नोंद केली. गतवर्षी देखील तिने तीन सुवर्णपदक पटकावले होते. मुलांच्या गटात आसामच्या अनुभव पराशरने 1.01.14सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले.
4X50मी मिडले प्रकारात मुलांच्या गटात दिल्लीच्या संघाना 2.24.30सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. 4X50मी फ्रीस्टईल प्रकारात मुलांच्या गटात आसामच्या संघाने 1.55.17सेकंद वेळेसह सुवर्णपदक मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटे व क्रीडा व युवक सेवा संचालनलयाचे संचालक नरेंद्र सोपल, शिव छत्रपती पुरस्कार विजेते व 1928 सालच्या दिल्ली आशियायी खेळातील वॉटर पोलो संघाचील खेळाडू संजय करंदीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनचे सचिव झुबिन अमेरिया व स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी आणि महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अभय दाढे, भारतीय ऑलंपिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विरेंद्र नानावटी, ग्लेनमार्क अॅक्वेटिक फाऊंडेशनचे तांत्रिक संचालक पीटर गारट्रेल आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- 100मी बॅकस्ट्रोक मुले(11-12 वयोगट)- 1. साहिल लस्कर(पश्चिम बंगाल, 1.05.93से), 2. देवांश परमार(गुजरात, 1.10.63से), 3. आर.अक्षय शेट(कर्नाटक, 1.12.11से)
100मी बॅकस्ट्रोक मुली(11-12 वयोगट)- 1. निना व्यांकटेश(कर्नाटक,1.10.87से), 2. पलक धामी(महाराष्ट्र, 1.11.11से), 3. आर्या ठक्कर(गुजरात, 1.14.49से)
200मी मिडले मुले(9-10वयोगट)- 1. उत्कर्ष गौर(महाराष्ट्र, 2.42.91से), 2. रणबीर सिंग(दिल्ली, 2.46.51से), 3. एस.अथोबा मौथौ(मणिपुर, 2.51.19से)
200मी मिडले मुली(9-10वयोगट)- 1. जान्हवी कश्यप(आसाम, 2.46.95से), रिदिमा कुमार(कर्नाटक, 2.52.73से), 3. अंबर सिंग(कर्नाटक, 2-53.19से)
50मी बटरफ्लाय मुले(11-12वयोगट)- 1. शॉन गांगुली(गोवा, 28.61से), 2. अनुभव पराशर(आसाम, 29.78से), दिशांत बुरगोहेन(आसाम, 29.92से)
50मी बटरफ्लाय मुली(11-12वयोगट)- 1. संजिती सहा(महाराष्ट्र, 30.17से), 2. पलक धामी(महाराष्ट्र, 30.64से), 3. लतिशा मंडना(कर्नाटक, 31.61से)
50मी ब्रेसस्ट्रोक मुले(9-10वयोगट)- 1. ख्यातीमान कश्यप(आसाम, 39.03से), 2. बासीत अहमद(आसाम, 40.47से), रणबीर सिंग(दिल्ली, 40.65से)
50मी ब्रेसस्ट्रोक मुली(9-10वयोगट)- 1. जान्हवी कश्यप(आसाम, 43.11से), 2. प्रिथा देबनाथ(पश्चिम बंगाल, 43.36से), 3.संजना पाला( महाराष्ट्र, 43.45से)
100मी फ्रीस्टाईल मुले(11-12वयोगट)- 1. अनुभव पराशर(आसाम, 1.01.14से), 2. दिशांत बुरगोहेन(आसाम, 1.02.39से), 3.उत्कर्ष पाटील (कर्नाटक, 1.03.12से)
100मी फ्रीस्टाईल मुली(11-12वयोगट)- 1. वेदिका अमिन(महाराष्ट्र,1.02.77से), 2. शक्ती बालकृष्णन(तामिळनाडू, 1.06.27से), भाव्या सचदेवा(दिल्ली, 1.06.87से)
4X50मी मिडले मुले(9-10वयोगट)-1. दिल्ली(रवित खरब, रॉबीन सेन, रणबीर सिंग, सक्षम पावर 2.24.30से), 2. आसाम(बसित अहमद, पार्थ दत्ता, ख्यातीमान कश्यप, संस्कार भुयान 2.25.08से), 3. महाराष्ट्र(उत्कर्ष गोर, रिषभ दास, श्लोक खोपडे, विवान ठाकूर 2.25.67से)
4X50मी फ्रीस्टईल मुले(11-12वयोगट)- 1. आसाम(महोम्मद मिर्झा, दिशांत बुरगोहेन, अनुभव पराशर, इवांग ताये 1.55.17से), 2. पश्चिम बंगाल(अभिषेक दास, साहिल लष्कर, अंशू कर, प्रांजल पात्रा 1.55.58से), 3. कर्नाटक(ध्यान एम, आर. अक्षया शेठ, श्रेयस व्ही, उत्कर्ष पाटील 1.59.31से)
हाय बोर्ड मुले(वयोगट 12-13)-1. वाय प्रेमसन मैतैई(एसएससीबी, 251.20),2. श्रीकांत कोंढारे(महाराष्ट्र, 192.45), 3. युकर ताची(अरूणाचल प्रदेश, 192.40)
हाय बोर्ड मुली(वयोगट 12-13)-1. शिरा बोस(पश्चिम बंगाल, 138.80), 2. मेगन अल्मेडा(गोवा, 136.70), 3. हृदयी वाघ(महाराष्ट्र, 130.20)
1मी स्प्रिंग बोर्ड मुले(वयोगट 14-15)- 1. एन विल्सन सिंग(एसएससीबी, 276.55), 2. सतिश कुमार प्रजापती(एसएससीबी, 275.50), सात्विक गिरी(महाराष्ट्र, 267.20)
1मी स्प्रिंग बोर्ड मुली(वयोगट 14-15)- 1. तितिक्षा मराठे(मध्य प्रदेश, 218.30), 2. बिल्वा गिरम(महाराष्ट्र, 195.20), 3. मानोहारा शर्मा(कर्नाटक, 187.90)
3मी स्प्रिंग बोर्ड मुले(वयोगट 16-18)- 1. सुरजीत राजबंसी(एसएससीबी, 442.00), 2. हेमम सिंग(कर्नाटक,370.80), 3. दक्ष बाजपेयी(उत्तर प्रदेश, 327.10)
3मी स्प्रिंग बोर्ड मुली(वयोगट 16-18)- 1. रूतुजा पवार(कर्नाटक, 241.30),2. आश्ना चेवली(गुजरात, 231.20), 3. भाविका पिंगळे(मध्य प्रदेश, 230.55)
इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट जलतरणपटू मुले(11-12 वयोगट)- शॉन गांगुली(गोवा, 4 सुवर्णपदके व 3 विक्रम)
(9-10 वयोगट)- उत्कर्ष गौर (महाराष्ट्र, 5सुवर्णपदके, 2 विक्रम)
मुली(11-12 वयोगट)- वेदिका अमिन(महाराष्ट्र, 4सुवर्णपदके, 4विक्रम)
(9-10 वयोगट)- जान्हवी कश्यप(आसाम, 4सुवर्णपदके, 2 रौप्य, 3विक्रम)
सांघिक विजेतेपद(जलतरण)- मुले(11-12 वयोगट)- आसाम 66गुण,
(9-10 वयोगट)-महाराष्ट्र 67गुण
मुली- (11-12 वयोगट)- महाराष्ट्र 133गुण
(9-10 वयोगट)- कर्नाटक 85गुण
डायव्हिंग सांघिक विजेतेपद मुले(16-18 वयोगट)- एसएससीबी 30गुण
(14-15 वयोगट)- एसएससीबी 35गुण
(12-13 वयोगट)- एसएससीबी 25गुण
मुली- (16-18 वयोगट)- गुजरात 17गुण
(14-15 वयोगट)- महाराष्ट्र 27गुण
(12-13 वयोगट)- महाराष्ट्र 25गुण