राज्यात दिवसभरात ३ हजार ९५९ नवे करोना रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह केसेस एक लाखांपेक्षा कमी

Date:

मुंबई-महाराष्ट्रात मागील २४ तासात करोनाचे अवघे ३ हजार ९५९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज दिवसभरात ६ हजार ४७८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण १६ लाख ६९ हजार ९० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९१.५३ इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. राज्यात आज १५० करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३ लाख ७८ हजार ५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १४ हजार २७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.महाराष्ट्रात सध्या १० लाख ७१ हजार १६३ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ९ हजार ७९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ९९ हजार १५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ३ हजार ९५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १७ लाख १४ हजार २७३ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या १५० मृत्यूंपैकी ७० मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ४७ मृत्यू मागील आठवड्यातले आहे. उर्वरित ३३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...