28 व्या ‘महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये आपत्कालीन मदत कार्यासाठी ‘डायल 108 रूग्णवाहिका तैनात
पुणे :
‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या सुसज्ज ‘डायल 108’ सेवेच्या रूग्णवाहिका 28 व्या ‘महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेतील आपत्कालीन मदत कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा दिनांक 30 डिसेंबर 2015 ते 9 जानेवारी 2016 या कालावधीमध्ये ‘आर्मी इन्स्टिटुट ऑफ फिजिकल ट्रेनिंग’, रामटेकडी येथे तसेच दिनांक 3 ते 9 जानेवारी 2016 या कालावधीमध्ये ‘सणस ग्राऊंड’, स्वारगेट येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. रामटेकडी येथे आयोजित स्पर्धेच्या ठिकाणी ‘डायल 108 सेवेच्या 10 रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून, ‘सणस ग्राऊंड’ येथील स्पर्धेच्या ठिकाणी 1 रूग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
स्पर्धेदरम्यान तैनात करण्यात येणार्या रूग्णवाहिकांमध्ये डॉक्टर, परिचारीका, सहाय्यक आणि आपत्कालीन प्रसंगी लागणारी औषधे असणार आहेत. पोलीसांमध्ये ‘डायल 108’ रूग्णवाहिका सेवेची जनजागृती होण्यासाठी तसेच स्पर्धेतील आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतकार्य देण्याच्या प्रमुख उद्देशाने या रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान दिनांक 30 डिसेंबर 2015 रोजी ‘आर्मी इन्स्टिटुट ऑफ फिजिकल ट्रेनिंग’, रामटेकडी, हडपसर येथे सुरू झालेल्या या स्पर्धांदरम्यान फुटबॉल स्पर्धेतील स्पर्धकाला अचानक झटका (लेर्पीर्ींश्रीळेप) आल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. रूग्णाला डायल 108 सेवेच्या रूग्णवाहिकेद्वारे तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यात आली. रूग्णवाहिकेद्वारे नजीकच्या वानवडी शिवरकर रूग्णालयात दाखल करण्यात आले, असे देखिल डॉ. सोमवंशी यांनी सांगितले.
‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’चे डॉ.भूषण सोमवंशी (जिल्हा व्यवस्थापक), डॉ. राहुल गांधले, डॉ. सुनील वायदंडे, डॉ. अर्चना धडस, सागर थावरे, सुधीर कांबळे यांनी सहकार्य केले आहे.
पोलीसांमध्ये राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या डायल 108 रूग्णवाहिका सेवेची जनजागृती होण्यासाठी तसेच स्पर्धेतील आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतकार्य देण्याच्या प्रमुख उद्देशाने या रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्याचे डॉ.भूषण सोमवंशी यांनी सांगितले.
‘अपघात’, ‘जळीत’, ‘विषबाधा’, ‘हदयविकार’, ‘अर्धांगवायू’ अशा कोणत्याही आपत्कालिन गोष्टीत दूरध्वनी केल्यास ‘डायल 108’ रुग्णवाहिका वैद्यकीय मदत पुरवते आणि नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करते.