पुणे- सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकां करिता ” रोड सेफ्टी व्हॅल्युएबल इनपुट सर्टिफिकेट कोर्स ” दिनांक चार ऑगस्ट पाच ऑगस्ट सहा ऑगस्ट 20 21 तीन दिवसाचा निवासी कोर्स आयोजित करण्यात आला होता या कोर्समध्ये आत्तापर्यंत 160 महिला ड्रायव्हिंग स्कूल संचालिका व 110 पुरुष ड्रायव्हिंग स्कूल संचालक यांनी हा कोर्स यशस्वीपणे पुर्ण केला आहे सदर ॲडव्हान्स रोड सेफ्टी च्या अंतर्गत मोटार वाहन कायद्यात झालेले बदल नवीन लागू झालेला केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 2021 18 वर्षाखालील अज्ञान मुले व मुली यांना पालकांनी ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवण्यास दिले असला कायद्यात झालेल्या नवीन तरतुदी बाबतची माहिती सर्वप्रथम ॲम्बुलन्स ला पुढे जाण्यास जागा द्या असे न केल्यास कायद्यात झालेली दंडाची तरतूद ड्रंक अंड ड्राईव्ह गुन्हा केल्यास कायद्यात असलेली तरतूद अपघात झाल्यास फर्स्ट एड व ट्रामा या विषयाची माहिती रोड मार्किंग व वाहतुकीची कायदा कलम चिन्हे त्यांचा अर्थ आणि राउंड अबाउट रस्त्यावर पहिला अधिकार कुणाचा? याबाबत मोटार वाहन कायद्यातील तरतुदी सांगितल्या गेल्या .आयडीटीआर पुणे ला भेट देत संपूर्ण वाहनातील अंतर्गत इंजिन गिअर बॉक्स संपूर्ण सेक्शनल पार्टची माहिती चार चाकी हलकी वाहने अवजड वाहने बस चालवण्याचे प्रात्यक्षिक बचावात्मक ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग करताना घ्यावयाची काळजी पावसाळ्यात गाडी चालवताना घेण्याची काळजी चार चाकी हलकी वाहने व अवजड वाहने यांचे सीमीलेटर( Simulator) वर धुक्यात गाडी चालवणे, पावसात गाडी चालवणे ,अभासी वातावरण गाडी चालवणे महिलांना वाहनाची तोंड ओळख होणे या सर्वाचा समावेश सिम्युलेटर ट्रेनिंग मध्ये करण्यात आला आहे
हा सर्टिफिकेट कोर्स संजय ससाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांच्या संकल्पनेतून सुरू झाला कोर्स सर्टिफिकेट प्रदान करण्याचा कार्यक्रम निवृत्त सांडी अधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते व डॉ कॅप्टन सनेर पाटील संचालक सी आय आर टी पुणे, शेखर ढोले सचिव आयडीटीआर पूणे ,प्रशांत काकडे (सी एम डी सी )सी आर टी पुणे ,राजीव घाटोळे प्राचार्य आयडीटीआर पुणे या मान्यवरांच्या उपस्थित पार पडला मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी बुलढाणा पुणे व कोल्हापूर जिल्हा अशा एकूण 50 संचालकांनी भाग घेतला सदर बॅचला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्यावतीने राजू घाटोळे अध्यक्ष यशवंत कुंभार महासचिव विलास आपटे कार्याध्यक्ष सुनिता चोहान कार्याध्यक्ष अनंत कुंभार वरिष्ठ उपाध्यक्ष निलेश गांगुर्डे कोषाध्यक्ष विवेक खाडे अध्यक्ष पनवेल मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन व असोसिएशनचे प्रवक्ते भारती निलेश पाटील अध्यक्ष वसई विरार बोरवली सुनील मोरे, माजी अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन ज्येष्ठ संचालक उदयकांत देसाई ,गुंडा मस्के, दीपक रावळ ,शकील मुजावर आदी पदाधिकारी उपस्थित होते सी आय आर टी पुणे व महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील मोटार ड्रायव्हिंग संचालका करिता हा कोर्स आयोजित करण्यात आला यामध्ये सेफ किड फाउंडेशनच्या गीतांजली थोरात यांनी रोड सेफ्टी ट्रामा केअर आणि हा गुड समरीतन् कायदा आणि रस्ता सुरक्षा या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले सरकार मान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकां करिता अशा वीस बॅच महाराष्ट्र राज्यातील ड्रायव्हिंग स्कूल संचालकांचा साठी आयोजित करण्यात येणार आहेत तसेच संपूर्ण भारतात राज्याबाहेरील ड्रायव्हिंग स्कूल संचालकांचा साठी सुद्धा या सर्टिफिकेट कोर्स आयोजित करण्यात येणार आहे पुढील सर्टिफिकेट कोर्स 24 25 26 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे अशी माहिती राजू घाटोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन यांनी दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत काकडे यांनी केले सदर प्रसंगी डॉ कॅप्टन राजेंद्र सनेर पाटील , शिवाजीराव देशमुख राजू घाटोळे यांनी ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन नेताजी बुवा यांनी केले
270 ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी केला ‘रोड सेफ्टी व्हॅल्युएबल इनपुट सर्टिफिकेट कोर्स “
Date:

