पुणे, 12 मार्च 2021: व्हिजन क्रिकेट अकादमी यांच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत अमन मुल्ला याने केलेल्या दोन्ही डावात केलेल्या भेदक गोलंदाजीसह श्रेयस केळकर(27धावा) व रोहित करंजकर(35 धावा) यांच्या छोट्या पण महत्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर 22 यार्डस क्रिकेट अकादमी संघाने व्हिजन क्रिकेट अकादमी संघाचा 3 गडी राखून पराभव करत विजय मिळवला.
व्हिजन स्पोर्ट्स सेंटर, सिंहगड रोड येथील मैदानावर सुरु असलेल्या तीन दिवसीय लढतीच्या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात व्हिजन क्रिकेट अकादमी संघाचा डाव 63.5षटकात 196धावावर संपुष्ठात आला. यात अक्षय पांचारिया 59, मयूर खरात 32, ऋषिकेश मोटकर 27, प्रितेश माधवन 26, शौनक त्रिपाठी 16 यांनी धावा केल्या. 22 यार्डस संघाकडून प्रज्ञेश बराटे 3-55, नितीश सालकर 1-18, आर्शीन देशमुख 2-39, अमन मुल्ला 2-63) यांनी सुरेख गोलंदाजी करत व्हिजन क्रिकेट अकादमी संघाला 196धावावर रोखले.
याच्या उत्तरात 22 यार्डस संघाला विजयासाठी 132 धावांची आवश्यकता होती. हे आव्हान 22 यार्डस संघाने 34.3 षटकात 7बाद 133धावा करून पूर्ण केले. यामध्ये रोहित करंजकरने 53चेंडूत 4चौकारांसह 35धावा, श्रेयस केळकरने 38चेंडूत 5चौकारांसह 27 धावा यांनी पहिल्या गड्यासाठी 78 चेंडूत 52 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. त्यानंतर अभिमन्यू सिंग चौहान 30, योगराज देशमुख 14, रणजित मगर 11 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. व्हिजन क्रिकेट अकादमीकडून गणेश जोशी 3-46, अक्षय पांचारिया 2-40, आर्य जाधव 2-26) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. संक्षिप्त धावफलक:पहिला दिवस: पहिला डाव: व्हिजन क्रिकेट अकादमी:73.1 षटकात सर्वबाद 233 धावा वि 22 यार्डस: 65षटकात सर्वबाद 297 धावा; 22 यार्डस संघाकडे पहिल्या डावात 64धावांची आघाडी; दुसरा डाव: व्हिजन क्रिकेट अकादमी: 63.5षटकात सर्वबाद 196धावा(अक्षय पांचारिया 59(43,5×4,4×6), मयूर खरात 32(104,2×4), ऋषिकेश मोटकर 27, प्रितेश माधवन 26, शौनक त्रिपाठी 16, प्रज्ञेश बराटे 3-55, नितीश सालकर 1-18, आर्शीन देशमुख 2-39, अमन मुल्ला 2-63) पराभूत वि 22 यार्डस:34.3 षटकात 7बाद 133धावा(रोहित करंजकर 35(53,4×4), श्रेयस केळकर 27(38,5×4), अभिमन्यू सिंग चौहान 30(39,2×4,1×6), योगराज देशमुख 14, रणजित मगर 11, गणेश जोशी 3-46, अक्षय पांचारिया 2-40, आर्य जाधव 2-26); सामनावीर-अमन मुल्ला; 22 यार्डससंघ 3 गडी राखून विजयी.
पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत 22 यार्डस संघाचा विजय
Date:

