पुणे दि.2:- मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 19 नोव्हेंबर 2020 चे आदेशाप्रमाणे मतदार यादीत मतदारांचे छायाचित्र अद्यावत करणेबाबत कळवले आहे. त्याप्रमाणे 215-कसबा विधानसभा मतदार संघात, ज्या मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र नाहीत अशा मतदारांची नावे व त्यांचेशी संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचे नाव व दूरध्वनी क्रमांक याचेसह यादी जिल्हाधिकारी पुणे, www.pune.nic.in या वेबसाईटवर व पुणे महानगरपालिकेच्या www.punecorporation.org या वेबसाईटवर पाहणीकरता उपलब्ध करण्यात आलेली आहे.
तरी ज्यांचे फोटो मतदार यादीत नाहीत अशा मतदारांनी त्यांचे अलीकडच्या कालावधीतील रंगीत पासपोर्ट साईज फोटो व ओळख पुरावा म्हणून (PAN कार्ड, आधार कार्ड, वाहन चालक परवाना) सह विहित नमुना फॉर्म क्रमांक 8 मध्ये सर्व तपशील नमूद करून स्वाक्षरीसह सदरचा अर्ज सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार पुणे शहर यांचे कार्यालयात आठ दिवसांच्या आत सादर करावा किंवा गुगल प्ले स्टोअर वरील voter helpline अॅप डाऊनलोड करून किंवा nvsp.gov.in या संकेत स्थळावरून फॉर्म नंबर 8 व फोटो वरील नमूद कागदपत्रांसह विहित मुदतीत अपलोड करण्यात यावा. ज्या मतदारांचे या कालावधीत रहिवास पुरावा व छायाचित्र जमा होणार नाहीत त्यांची नावे मतदार यादीतून वगळणी करणे बाबतची पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे मतदार नोंदणी अधिकारी, 215- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी उपविभाग, पुणे चे संतोषकुमार देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
215- कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र अदयावतीकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज आठ दिवसांत सादर करावा
Date:

