पुणे :
2017 च्या पालिका निवडणुक तयारीसाठी विकासकामांचा आढावा आणि नियोजनासाठी पुणे शहर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’च्या वतीने मार्गदर्शनरपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक शहरातील सर्व नगरसेवक, शहर पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, निरीक्षक, विधानसभा अध्यक्ष, ब्लॉग अध्यक्ष, सेल अध्यक्ष अशा सर्वांसाठी एकत्रित रविवारी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स टिळक रोड येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला खासदार अॅड.वंदना चव्हाण, महापौर दत्ता धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष कर्णे गुरूजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महापौर धनकवडे यांनी पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीविषयी पक्ष संघटनेला माहिती दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अॅड.वंदना चव्हाण म्हणाल्या,‘महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सभासद नोंदणीवर जास्तीत जास्त भर दिला गेला पाहिजे. नगरसेवक कार्यकर्त्यांनी कशा दृष्टीने पुढील काळात काम केेले पाहिजे याविषयी विस्तृत चर्चा यावेळी करण्यात आली. महानगरपालिकेच्या विकास कामांचा आढावा आणि नियोजन, नगरसेवकांनी केलेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. कार्यकर्त्यांनीही केलेल्या सूचनाही विचारात घेण्यात आल्या.