नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, जेएलएन स्टेडियम ते कक्कनड मार्गे इन्फोपार्कपर्यंत कोची मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2 च्या 1,957.05 कोटी रुपये खर्चाला मंजूरी दिली. या टप्प्यात 11.17 किलोमीटर लांबीचा मार्ग आणि 11 स्थानके उभारली जाणार आहेत. बंदर विमानतळ रस्त्याच्या रस्ता रुंदीकरणासह टप्पा-2 ची पूर्वतयारीची कामे वेगाने सुरू आहेत.
कोची मधील अलुवा ते पेट्टा पर्यंतचा टप्पा-I 25.6 किमी लांबीचा असून 22 स्थानकांसह 5181.79 कोटी रुपये खर्च यास आला आहे. तो पूर्णतः कार्यान्वित आहे.
पेट्टा ते एसएन जंक्शन दरम्यानचा 1.80 किमी लांबीचा कोची मेट्रो टप्पा 1ए प्रकल्पाला 710.93 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हा प्रकल्प राज्यातील प्रकल्प म्हणून राबवण्यात येत आहे. सध्या प्रकल्पाशी संबंधित सर्व बांधकामे संपली असून प्रकल्प उद्घाटनासाठी सज्ज आहे.
एसएन जंक्शन ते त्रिपुनिथुरा टर्मिनल पर्यंत 1.20 किमीचा कोची मेट्रो टप्पा 1बी प्रकल्प राज्यातील प्रकल्प म्हणून बांधकामाधीन आहे.
निधी नमुना:
S.No. | Source | Amount (in Crore) | % Contribution |
1. | GoI Equity | 274.90 | 16.23% |
2. | GoK Equity | 274.90 | 16.23% |
3. | GoI Subordinate Debt for 50% of Central Taxes | 63.85 | 3.77% |
4. | GoK Subordinate Debt for 50% of Central Taxes | 63.85 | 3.77% |
5. | Loan from Bilateral/Multilateral agencies | 1016.24 | 60.00% |
6. | Total Cost excluding Land, R&R and PPP Components | 1693.74 | 100.00% |
7. | GoK Subordinate Debt for Land including R&R cost | 82.68 | |
8. | State Taxes to be borne by GoK | 94.19 | |
9. | Interest during Construction (IDC) for loan and front end fees to be borne by GoK | 39.56 | |
10. | PPP Components (AFC) | 46.88 | |
11. | Total Completion Cost | 1957.05 |
पार्श्वभूमी:
कोची हे केरळ राज्यातील सर्वात दाट लोकवस्तीचे शहर असून विस्तारित महानगराचा भाग आहे. हा केरळमधील सर्वात मोठा शहरी भाग आहे. कोची महानगर क्षेत्राची लोकसंख्या 2013 मध्ये सुमारे 20.8 लक्ष, 2021 मध्ये 25.8 लक्ष होती तर 2031 पर्यंत 33.12 लक्ष असण्याचा अंदाज आहे.