दोन दिवसांच्या जीबीमध्ये ७ महिन्यांच्या कार्यपत्रिकांवरील १५८ विषय मान्य:

Date:

तब्बल ३४६ प्रस्ताव मांडलेदोन दिवस सलग आठ ते नऊ तास मुख्य सभा :

पुणे-पुणे महानगरपालिकेच्या मंगळवार आणि बुधवार या दोन दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेत (जीबी) विविध प्रकारचे तब्बल ३४६ प्रस्ताव मांडण्यात आले. त्यापैकी १५८ प्रस्ताव मान्य करण्यात आले. दोन दिवस सलग आठ ते नऊ तास चाललेल्या या सभेमध्ये कोणताही वाद विवाद, मतभेद न होता साधक बाधक चर्चा करत सर्व विषय एकमताने मान्य करण्यात आले, अशी माहिती सभागृह नेता गणेश बिडकर यांनी दिली.
महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवार आणि बुधवारी झाली. पालिकेच्या नवीन इमारतीमधील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही सभा पार पडली. दोन दिवसांच्या या सर्वसाधारण सभेत सात कार्यपत्रिकांवर चर्चा झाली. यामध्ये १५८ विषय मान्य करण्यात आले. करोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे दीड ते पावणे दोन वर्षांपासून अनेक गोष्टींवर बंधने आली. पालिकेच्या कामकाजावर देखील याचा परिणाम झाला. पालिकेच्या सर्वसाधारण सभाना याचा फटका बसला. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रस्ताव रखडले होते. त्यामुळे विकासाची कामे खोळंबली होती.
करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर महानगरपालिकेला ऑफलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा घेण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार करोनाच्या आवश्यक त्या नियमांचे पालन करून हे कामकाज करण्यात आले. सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून सभागृहात हे विषय मांडून त्यावर आवश्यक चर्चा करत सभासदांच्या शंकाचे समाधान करत हे प्रस्ताव मांडून मान्य करण्यात आले, असे सभागृह नेते बिडकर यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाच्या सभासदांबरोबर विरोधी पक्षाच्या सभासदांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. यापुढील काळात देखील शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणारे प्रस्ताव सर्वानुमते मांडून एकमताने मान्य करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा राहणार असल्याचे बिडकर यांनी आवर्जून सांगितले.

या प्रस्तावांना देण्यात आली मंजुरी….

  • स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्ग खर्च
  • हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग अंशतः बदल
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक उड्डाणपूल संरचना बदल खर्च
  • समाविष्ट अकरा गावे डिपी सहा महिने मुदतवाढ
  • करोनामुळे मृत्यू झालेल्या पालिकेच्या सेवकांसह रोजंदारी तसेच कंत्राटी कामगारांच्या वारसांना केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार अधिकाधिक मदत देणे.
  • शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ७२ ब नुसार निधी उपलब्ध करून देणे

७ महिन्यांच्या कार्यपत्रिका मान्य विषय
जानेवारी २०२१ -१५
डिसेंबर २०२० -२६
ऑगस्ट २०१९- ४४
फेब्रुवारी २०२०- १२
जुलै २०२१- ३६
ऑगस्ट २०२१- २४
सप्टेंबर २०२१- ०१

पालिकेत सत्ता स्थापन करताना शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही भारतीय जनता पक्षाने दिली आहे. पुणेकरांसाठी हे प्रस्ताव मार्गी लागणे गरजेचे आहे. करोनामुळे अनेक महत्वाचे विषय गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित होते. विरोधी पक्षाच्या गटनेत्यांशी चर्चा करून त्यांना हे विषय मान्य होणे किती आवश्यक आहे याची खात्री पटवून दिल्यानेच हे सर्व विषय एकमताने मान्य करण्यात आले. पुणेकरांच्या विकासासाठी येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने कामकाज करण्याचा प्रयत्न आहे.

  • गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांच्या निवडणूक रणनीतीने महापालिकेच्या राजकारणात...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...

प्रशांत जगताप यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष...