मुठा नदीत 13 हजार 142 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु ,भिडे पूल पाण्याखाली …

Date:

पुणे : धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, पुणेकरांना पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण 100 टक्के भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून रात्री आठच्या सुमारास 13 हजार 142 क्युसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणामधील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. पावसाळ्यापूर्वी नदी पात्रातील जलपर्णी महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी न काढल्याने नदी पात्रात असलेली जलपर्णी आज सकाळी बाबा भिडे पुलाजवळ येऊन मोठ्या प्रमाणावर अडकली होती. यानंतर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनने त्वरित सूत्रं हलवित ही जलपर्णी जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढून पाण्याला मार्ग मोकळा करून दिला.संध्याकाळी भिडे पूल पाण्याखाली गेला .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...