पुणे -शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूरला जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी त्यांच्या अधिकारात घेतल्याने याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महात्मा फुले मंडई ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान मोर्चा काँग्रेस पक्षाने काढला . या मोर्चाचे नेतृत्व माजी ग्रहराज्य मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले.दरम्यान पाण्याच्या प्रश्नावरून कोणी राजकारण करू नये. पुण्यातील काही मित्रांनी आंदोलन केले. ते थांबवावे, अशी मी विनंती करतो,‘‘ असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. पुण्याला ऑगस्टपर्यंत पुरेल एवढे पाणी असून, पुणे शहराच्या पाण्यात एक थेंबही कपात करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण भागाला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेला. त्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले मंडई ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चाचे आयोजन केले होते. याचे नेतृत्व माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले. उपमहापौर मुकारी अलगुडे, महापालिकेतील गटनेते आणि विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड आणि नगरसेवक अविनाश बागवे, नगरसेवक संजय बालगुडे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. पाणी प्रश्नासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवदेन देण्यात आले.
या विषयी माजी गृहराज्यमंत्री आणि पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, मागील काही माहिन्यांपासून पुणेकर जनतेने काटकसर करून पाण्याची बचत केली आहे. त्यात ग्रामीण भागाला 1 टीएमसी पाणी देण्याचा जिल्हाधिकारी सौरभ राव यांचा निर्णय चुकीचा आहे. त्यांना अर्धा टीएमसी पाणी देण्याची गरज होती. टँकर किंवा रेल्वेने पाणी देण्याची गरज होती. असे प्रशासनाने केले नाही. याचा तीव्र शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला.
‘पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण’
दरम्यान ‘पाण्याच्या प्रश्नावरून कोणी राजकारण करू नये. पुण्यातील काही मित्रांनी आंदोलन केले. ते थांबवावे, अशी मी विनंती करतो,‘‘ असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. पुण्याला ऑगस्टपर्यंत पुरेल एवढे पाणी असून, पुणे शहराच्या पाण्यात एक थेंबही कपात करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूरला पाणी सोडण्याच्या निर्णयावरून गेले तीन दिवस पुण्यात विरोधी पक्षांनी बापट यांच्याविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बुधवारी प्रशासनाची भूमिका आणि पाणीवाटपाची स्थिती सांगितली. धरणांतून कालव्याद्वारे पाणी सोडण्यास कालपासून सुरवात झाली. या पार्श्वभूमीवर बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘महापालिकेने मुंढवा जॅकवेल येथून शेतीसाठी एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी दिले. धरणापासून पर्वती जलकेंद्रापर्यंतच्या जलवाहिनीमुळे कालव्याद्वारे पाणी घेणे थांबले. कालव्यातून होणारा 0.25 टीएमसी पाण्याचा पाझर थांबला. खडकवासला धरणात एक टीएमसी अचल साठा आहे. धरणात जॅकवेल बांधल्याने पंपिंग करून अचल साठ्यातील पाणी घेता येईल. कालव्यातून सोडलेल्या पाण्याची चोरी थांबविण्यासाठी पथके नेमली. विद्युत मोटारी जप्त केल्या. पाण्यावर कोणा एकाचा हक्क नाही. इंदापूरला 0.8 टीएमसी आणि दौंडला 0.5 टीएमसीची मागणी होती. त्यात कपात करून एक टीएमसी पाणी देत आहोत. तेथील तीन लाख लोकसंख्येला आणि जनावरांना पाणी दिले पाहिजे. पाणी सर्वांचे आहे .

