केशवराव जेधे यांची १२५ वी जयंती ; रमेश बागवे, रोहित टिळक यांची उपस्थिती

Date:

पुणे :  महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक जीवनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे, सत्यशोधक चळवळीचे नेते, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि भारताच्या घटना समितीचे सदस्य देशभक्त केशवराव जेधे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या वंशजांनी स्वारगेट चौकातील केशवराव जेधे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत व शासनाचे सर्व नियम पाळून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस रोहित टिळक, पुणे शहर युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष सौरभ अमराळे, फाऊंडेशनचे युवा कार्यकर्ते केशवराव जेधे यांचे पणतू कान्होजी दयानंद जेधे, रायभान जेधे, विरेन जेधे, अक्षय माने आदी उपस्थित होते. 
रमेश बागवे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीश कालखंडात स्वातंत्र्यासाठी जेधे घराण्याचे मोठे योगदान आहे. देशाला संविधान असावे, याकरीता स्थापलेल्या घटना समितीवर केशवराव जेधे हे सदस्य होते. त्यानंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची देखील स्थापना केली. केशवराव जेधे हे शिक्षक, पत्रकार, संपादक, कवी, लेखक, लोकनेते, सत्यशोधक व शाहीर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. 
रोहित टिळक म्हणाले, कॉंग्रेसचा पाया अधिक व्यापक करणारे आणि बहुजन समाजाला बळकट नेतृत्व देणारे असे केशवराव जेधे हे व्यक्तिमत्व होते. कॉंग्रेसचा प्रसार व्हावा व प्रभाव वाढावा, याकरीता त्यांनी महाराष्ट्राचा ग्रामीण भाग पिंजून काढला होता. महाराष्ट्र कॉंग्रेसचा पाया विस्तारुन त्यांनी भक्कम केला व या अनुषंगाने राजकारणही तळागाळापर्यंत नेले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील ते अग्रणी होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...