‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ मधील पलक म्हणजे कीकू ला अटक .. कलाकारांच्या वर्तुळात खळबळ

Date:

मुंबई : ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये पलकची भूमिका साकारणारा अभिनेता किकू शारदाने हाथ जोडून माफी मागितली त्यान्नातारही त्याला माफी न देता  अटक केल्यानंतर त्याला चंडीगड कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांची मिमिक्री करण्याच्या आरोपाखाली किकूला अटक करून, किकूविरोधात कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली .कॅथल पोलिसांनी आज सकाळीच कीकूला मुंबईत अटक केली. त्यानंतर त्याला चंदीगडमधील कोर्टात हजर केलं. कोर्टाने किकूला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोमध्ये किकूने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांची मिमिक्री केल्याचा आरोप आहे दरम्यान, किकूने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे. “जर माझ्यामुळे कोणाचं मन दुखावलं असेल, तर मी हात जोडून माफी मागतो”, असं किकूने म्हटलं आहे.27 डिसेंबर रोजी प्रक्षेपित झालेल्या भागात पलकने ही नक्कल केली होती.दरम्यान,किकुच्या अटकेने कलाकारांच्या वर्तुळात खळबळ उडाली असून हि कॉमेडी प्रदर्शित करणाऱ्या कलर्स या वाहिनीवर कारवाई होणार काय ? या शो च्या निर्माता दिग्दर्षाकावारही कारवाई होवू शकते काय ? याबाबत खल होत आहेत

रझा मुराद यांच्याकडून निंदा –

अभिनेता रझा मुराद यांनी किकूच्या अटकेबद्दल निंदा व्यक्त केली आहे. जर किकूने माफी मागितली असेल, तर त्याला अटक का?, असा सवाल रझा मुराद यांनी विचारला आहे.याशिवाय कॉमेडीयननी संयम राखावा असंही, मुराद यांनी म्हटलं आहे.

कपिल शर्मा कडून संत गुरमीत राम रहीम यांना आवाहन

संत गुरमीत राम रहीम यांच्यातील मानवतेला माझे निवेदन आहे कि या प्रकरणी मिडिया समोर येवून , एक कलाकार जो खुशिया , आनंद वाटण्याचे काम करतो त्याच्या बाजूला उभे राहून त्याच्या मागे उभे राहून जगाला माणुसकीचे सुरेख दर्शन घडवून द्यावे. शांती आणि  आनंदासाठी सारे मिळून काम करू यात असे कपिल शर्मा ने म्हटले आहे

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात इफ्तारवेळी मुस्लिम तरुणांवर हल्ला; आठ आरोपी अटकेत

पुणे, : पुणे जिल्ह्यातील बोपदेव घाट परिसरात इफ्तारच्या...

वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार: विश्वास पाठक

मुंबई, 27 मार्च 2026 महावितरणतर्फे राज्यात होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या संदर्भात...

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रती लीटर दहा रुपयांची घट

तेलाच्या दरवाढीच्या धक्क्यापासून, ग्राहक आणि तेल विपणन कंपन्यांचे संरक्षण...