औंध येथील वाहतूक कोंडी बद्दल तातडीने उपाय योजना कराव्यात

Date:

सुनील माने यांचे आयुक्त तसेच वाहतूक पोलीस उपायुक्तांना निवेदन

पुणे ता.७ : औंध – परिहार चौक, नागरस रोड, डीपी रोड, औंध – सांगवी जोडणारा राजीव गांधी पुल या परिसरात भाले चौक येथे दररोज आणि प्रामुख्याने सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात अशी विनंती भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना ई-मेलद्वारे तर वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना प्रत्यक्ष भेटून दिले.

निवेदनात म्हटले आहे की, औंध – परिहार चौक, नागरस रोड, डीपी रोड, येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. येथील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी औंध – सांगवी जोडणारा राजीव गांधी पुल बांधण्यात आला. मात्र तरीही येथील वाहतूक समस्या कायम आहे. अरुंद रस्त्यामुळे येथील भाले चौक येथे बॉटल नेक तयार होऊन सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या भागात असणारे शॉपिंग मॉल, आय.टी कंपन्या, दुकाने, स्थानिक रहिवासी यांच्यासाठी वाहतुकीचा प्रश्न जटील होत आहे. यासाठी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे.

या भागातील स्थानिक नागरिकांना आणि परिसरात विविध कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करणे, बैठक करणे, आणि सूचना घेऊन तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे.

रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी सिंगापूर प्रमाणे बिल्डींग मधील रिकाम्या जागांचा उपयोग करता येईल का? काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक करता येईल का? लोकांची वाहने दूर अंतरावर पार्क करून त्यांना इलेक्ट्रिक बस व अन्य साधनांनी त्यांच्या इच्छित स्थळी नेता येईल का? या उपायांचा विचार करता येईल काय हे पाहावे, त्याचबरोबर या परिसरात प्रामुख्याने संध्याकाळ ते रात्रीपर्यंत अतिरिक्त वाहतूक पोलीस व वॉर्डन नियुक्त करावे. अशाप्रकारचे उपाय त्यांनी महापालिकेला तसेच वाहतूक विभागाला सुचवले आहेत. या पर्यायांवर विचार करून स्थानिक नागरिक व या भागात येणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी विनंती ही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...