सिंधुदुर्ग – महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तर्फे दिला जाणारा ‘ महिला दर्पण पुरस्कार प्रगती बाणखेले -कोल्हे यांना पत्रकारदिनी, बाळशास्त्री जांभेकरांच्या गावी पोंभुर्ले इथे प्रदान करण्यात आला . यासंदर्भात प्रगती बाणखेले म्हणाल्या ,’सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे छोटंसं गाव. तिथं महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेनं जांभेकर यांचं स्मारक म्हणून एक छान सभागृह उभारलंय. मराठी पत्रकारितेच्या या आद्य पुरुषाने ज्या मुंबईमधून मराठीतले पहिले वर्तमानपत्र, ‘दर्पण’ सुरू केले, त्या मुंबईत मात्र त्यांची ‘ना चिरा ना पणती’ अशी अवस्था आहे. हे महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणे तर आहेच, पण मुंबईतल्या आम्हा पत्रकारांसाठीही तेवढेच लाजिरवाणे आहे.