· अकरा प्रभावी कल्पनांची अंतिम निवड; त्यांचा पुढील विकास आणि इनक्युबेशन यांसाठी बक्षीस व प्रोत्साहन
· सर्वांगीण वाढ व विकास साधण्यासाठी सामाजिक नावीन्यतेला प्रोत्साहन देण्याचे काम करण्याकरीता व्यासपीठाची निर्मिती
पुणे | ६ जुलै २०२२ : शेफलर इंडिया लि. (बीएसइ: 505790, एनएसइ: SCHAEFFLER) या औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील अग्रगण्य पुरवठादार कंपनीने आज आपल्या ‘सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्रॅम’साठी निवडलेल्या १५०पैकी ११ विजेत्या कल्पना जाहीर केल्या. २४ आठवडे चाललेले मूल्यांकन आणि ज्युरींची प्रक्रिया यानंतर निवडलेल्या १५०हून अधिक प्रवेशिकांमधून ११ कल्पनांना आज पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात विजेते म्हणून घोषित करण्यात आले. ‘शेफलर इंडिया’ने २०२१च्या तिसर्या तिमाहीत ‘सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्रॅम’ जाहीर केला होता. वंचितांसाठी शिक्षण, आरोग्य व पोषण, अक्षय ऊर्जा व पर्यावरण, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण कल्पना सुचविण्यासाठी हे अर्ज मागविण्यात आले होते. ‘शेफलर’ने ‘बडी4स्टडी’ या भारतातील सर्वात मोठ्या शिष्यवृत्ती प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली आहे. ही संस्था शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज पुरवठादार यांची पात्र विद्यार्थ्यांशी गाठ घालून देते.
प्रोग्रॅममधील पहिल्या विजेत्या कल्पनेला पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले असून उर्वरित १० विजेत्या कल्पनांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले आहे. सर्व ११ विजेत्यांना भारतातील अत्युत्कृष्ट शिक्षण संस्थांपैकी एक, ‘आयआयएम अहमदाबाद’ येथील सीआयआयई (सेंटर फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन अँड एंटरप्रेन्योरशिप) येथे आठ आठवड्यांची हायब्रीड मेंटॉरशिप दिली जाईल. त्यातून त्यांना आपले सोल्यूशन आणखी विकसित करण्यास आणि त्याचे प्रत्यक्षात रुपांतर घडविण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, या विजेत्यांसह शेफलर इंडिया सहयोग करणार असून त्यांना पुढील सहयोग व संधी यांची उपलब्धता करून देण्यासाठी आपल्या नेटवर्कमध्येही सामावून घेईल.
स्पर्धेच्या ज्युरींमध्ये ‘शेफलर इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षा कदम, एचआर विभागाचे उपाध्यक्ष व सस्टेनेबिलिटी इंडियाचे प्रमुख संतनू घोषाल आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते सामाजिक उद्योजक व ‘गुंज’चे संस्थापक अंशु गुप्ता यांचा समावेश होता.
सर्वांगीण विकास आणि वाढ यांसाठी शेफलर इंडिया सक्रियपणे आपल्या ईएसजी धोरणाचा पाठपुरावा करीत आहे. वंचितांसाठी शिक्षण, आरोग्य व पोषण, अक्षय ऊर्जा व पर्यावरण, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या तरुण नवोदितांची क्षमता ओळखण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी ‘शेफलर इंडिया’च्या सामाजिक विकास उपक्रमाचा एक भाग असलेल्या या प्रोग्रॅमच्या माध्यमातून उत्प्रेरक म्हणून काम करण्यात येते.
प्रोग्रॅममधील विजेत्यांचे अभिनंदन करताना हर्षा कदम म्हणाले, “नावीन्यता आणि विकास यांमुळे एकंदरीत वाढ होत असते. अर्थात, समन्यायी नवोपक्रम ही सर्वसमावेशक वाढीची गुरुकिल्ली आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा अनेक उत्कट कल्पना पाहता येणे आनंददायी असते. या कल्पनांमधून सामाजिक जडणघडणीवर सकारात्मक परिणाम होत असतो. विकास आणि सर्वांगीण वाढीला चालना देणारी तंत्रज्ञानातील नावीन्यता आपण सामान्यपणे पाहात असतो. शेफलर इंडिया येथे आम्हाला या वस्तुस्थितीची जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही या प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे.”
या घोषणेबाबत बोलताना संतनू घोषाल म्हणाले, “आम्ही आपल्या समाजाची समृद्धी आणि प्रगती साधण्यासाठी कटिबद्ध आहोत. भारतभरातील तरुण व उत्कट नवोन्मेषकांच्या अग्रगण्य भावनांचा उपयोग करून सामाजिक व पर्यावरणीय समस्यांमध्ये सुधारणा घडवून आणणे, हा ‘शेफलर इंडिया सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्रॅम’चा उद्देश आहे. या फेलोशिप कार्यक्रमासाठी निवड झालेल्या उत्कृष्ट नेत्यांच्या गटाचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. या विजेत्यांनी २१ व्या शतकातील समस्यांवर परिवर्तनात्मक उपाय विकसित करण्यासाठी दृढ कटिबद्धता दर्शविली आहे. त्यातून अधिक समर्थ अशी व्यवस्था, समाज आणि लोक निर्माण होतील.”
मॅगसेसे पुरस्कार विजेते सामाजिक उद्योजक व ‘गुंज’चे संस्थापक अंशु गुप्ता यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण करताना म्हटले, “या कार्यक्रमाचा एक भाग बनणे हा अत्यंत आनंददायी आणि समृद्ध करणारा अनुभव होता. उत्कटतेने आपल्या कल्पनांचा पाठपुरावा करणाऱ्या सर्व विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. तसेच, सामाजिक प्रभाव साधणाऱ्या कल्पनांना पुढे आणण्यासाठी हे व्यासपीठ तयार करणाऱ्या ‘बडी4स्टडी’ आणि ‘शेफलर इंडिया’ यांच्या टीम्सचेही मी अभिनंदन करतो. विविध समस्यांचा गाभा समजून घेण्याचा आणि नवीन दृष्टिकोन व उपाय सादर करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील तरुण कसा करीत आहेत, हे पाहणे अत्यंत नवलाचे होते.”
निवड प्रक्रिया:
या प्रोग्रॅमच्या फेलोशिपसाठी उमेदवारांच्या नोदणीची प्रक्रिया गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झाली. ‘शेफलर इंडिया’ला देशभरातील तरुण नवोदितांकडून ५५७ अर्ज प्राप्त झाले. अत्यंत पारदर्शक स्वरुपाची आणि कठोर अशी तीन टप्प्यांतील निवड प्रक्रिया यावेळी पार पाडण्यात आली. या प्रक्रियेमध्ये ज्युरी पॅनेल आणि शेफलर इंडियाचे अधिकारी यांनी घेतलेल्या मुलाखती आणि सादरीकरणे यांचा समावेश होता. प्राथमिक तपासणी फेरीत, ५५७पैकी १६७ उमेदवार निवडले गेले.
या निवडलेल्या उमेदवारांना पहिल्या फेरीत चार वेगवेगळ्या निकषांमधून जावे लागले. वयोगट, सामाजिक उपक्रमाचा सध्याचा टप्पा, सादर करण्यात येणाऱ्या कल्पनेची श्रेणी आणि परिचयात्मक डेक किंवा व्हिडिओ पिच, असे हे निकष होते. या पहिल्या फेरीअखेर ४२ उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी निवडले गेले.
दुसरी फेरी ही भारतातील विविध ठिकाणांहून आलेल्या ‘शेफलर’च्या प्रशिक्षित कर्मचार्यांनी आयोजित केली होती. या फेरीत उमेदवारांना सर्वसमावेशक अशी प्रश्नावली आणि स्कोअर कार्ड यांच्या आधारावर तपासण्यात आले. दुसऱ्या फेरीनंतर तिसऱ्या आणि अंतिम फेरीसाठी ११ उमेदवारांची निवड करण्यात आली.
अंतिम फेरीत, या ११ उमेदवारांनी आपापली सोल्यूशन्स ज्युरी पॅनेलसमोर मांडली. या पॅनेलमध्ये ‘शेफलर इंडिया’चे अधिकारी आणि एक सामाजिक उद्योजक यांचा समावेश होता. उमेदवारांचे सादरीकरण आणि त्यानंतरच्या मुलाखती यांच्या आधारे पॅनेलने खालील विजेत्यांची निवड केली आहे: (एका सत्कार समारंभात)
| विजेत्यांची नावे | विजेत्यांच्या सोल्यूशनचे नाव | श्रेणी |
| पूर्वा परवानी | क्लेलॅब एज्युकेशन फाउंडेशन | वंचितांसाठी शिक्षणामध्ये परिवर्तन |
| निक्की कुमार झा | सप्तकृषी सायन्टिफिक प्रा. लि. | अक्षय ऊर्जा व पर्यावरण |
| स्वालि सी आय | इलेक्ट्रिकल रिट्रोफिटींग | अक्षय ऊर्जा व पर्यावरण |
| शिल्पा के नयना | डाइम क्लीअर प्रा. लि. | जलसंधारण |
| हिमांशू गुप्ता | कृषी कचर्याचे औद्योगिक उपयोजनासाठीच्या मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये रूपांतर | कचरा व्यवस्थापन |
| आदित्य श्रीनिवास | रोहा बायोटेक | कचरा व्यवस्थापन |
| दीपक राजमोहन | ग्रीनपॉड लॅब्ज | कचरा व्यवस्थापन |
| लक्ष्मणन | अधेझिव्ह नॉन-सर्जिकल हिअरींग डिव्हाइस | आरोग्य व पोषण |
| आर्द्रा एस नायर | इकोकन्टेनर्स फ्रॉम रिसायकल्ड कॉईल फायबर | कचरा व्यवस्थापन |
| डॉ. नेहा तुली | 6डीओएफ सोल्यूशन्स प्रा. लि. | वंचितांसाठी शिक्षणामध्ये परिवर्तन |
| सुलेम अन्सारी | ओरल ल्युकोप्लाकियाच्या (कर्करोग-पूर्व जखम) उपचारांसाठी रेटिनो ए (०.१%) क्रीमसोबत मोरिंगा ओलिफेरा लीव्हज एक्स्ट्रॅक्ट जेलच्या (२%) परिणामकारकतेची तुलना : डबल ब्लाइंडेड रॅन्डमाईज्ड कंट्रोल ट्रायल | आरोग्य व पोषण |

