पुणे :
‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’, ‘राष्ट्रीय समाज पक्ष’, ‘रिपाई’ आणि ‘शिवसंग्राम’ हे भाजपचे घटक पक्ष एकत्रितपणे पुण्यात शुक्रवार, दिनांक 11 सप्टेंबरला (11 वाजता ) ‘विद्यार्थी हक्क परिषद’ घेणार असल्याचे शिवसंग्राम विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शैलेश सरकटे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते दीपक बिडकर यांनी सांगितले.’
‘स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या वयाची अट 40 वर्षे करावी, ही प्रमुख मागणी या परिषदेत केली जाणार आहे . आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांकरिता 37 वर्षांपर्यंत परीक्षा देता येतात. देशातील 9 राज्यांमध्ये सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थ्यांना 42 वर्षांपर्यंत परीक्षा देता येतात; परंतु राज्यात खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना 33 व्या वर्षातच थांबावे लागते. ही वयोमर्यादा सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी 40 वर्षे करावी, यासाठी घटक पक्षांचे सर्व नेते पुण्यात एकत्रितपणे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत,
घटक पक्षांच्या पुणे शहराध्यक्षांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेवून विद्यार्थी हक्क परिषदेची माहिती दिली . या परिषदेला विनोद तावडे (शिक्षणमंत्री), परिषदेचे अध्यक्ष विनायक मेटे (राष्ट्रीय शिवसंग्राम, अध्यक्ष,शिवस्मारक समिती), गिरीश बापट (पालकमंत्री), खासदार राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), महादेव जानकर (अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष), भारती लव्हेकर (आमदार, शिवसंग्राम), अविनाश महातेकर (आरपीआय), सदाभाऊ खोत (स्वाभिमानी शेतकरी संघटना), अजिंक्य पाटील (डी. वाय. पाटील विद्यापीठ), डॉ. सुधाकर जाधवर (शिक्षणतज्ज्ञ), तानाजी शिंदे (प्रदेश अध्यक्ष), आयोजक शैलेश सरकटे (विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र राज्य) इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते.
प्रचलित शिक्षण पद्धती बदलून व्यावहारिक शिक्षण प्रणाली तयार करणे * महाराष्ट्र लोकसेवा आयोग (चझडउ) किंवा तत्सम स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा 40 वर्षे करावी. * आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचे संपूर्ण शिक्षण मोफत करावे. (प्राथमिक, माध्यमिक, उच्च व तंत्रशिक्षण). * ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनीकरिता मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर इत्यादी मोठ्या शहरात वसतिगृहे उभी करावीत.* पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची वयोमर्यादा वय 28 वरून 33 वर्षे करावी. * खासगी कोचिंग क्लासेस नियंत्रणात ठेवणारा कायदा करावा. या मागण्या करण्यात येणार आहेत
तुषार काकडे (शिव संग्राम), भरत लगड (शिव संग्राम), देवेंद्र धायगुडे (रासप), महेंद्र कांबळे (आरपीआय), अॅड. योगेश पांडे (स्वाभिमानी), शेखर पवार (शिवसंग्राम), मंदार जोशी (आरपीआय) हे नेते परिषदेला उपस्थित राहणार आहेत


